पुणेरी मिसळ
साहित्यः 1 कप मटकी, पाव कप हिरवे मूग, पाव टीस्पून हळद,1 टीस्पून धणे-जिरे पूड, 1 टीस्पून साखर, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, मीठ चवीनुसार, 1 टेबलस्पून तेल, चिमूटभर राई.
सजावटीसाठीः चटणी, शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 कप फेटलेले दही.
कृतीः मटकी व मूग रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. दुसर्या दिवशी पाणी निथळून मोड येण्यासाठी 6-7 तास ठेवा. एका पॅनमध्ये तेल गरम करून राई टाका. मोड आलेले मूग व मटकी टाकून शिजवा. सर्व मसाले व लिंबाचा रस टाकून थोडा वेळ शिजवा. चटणी, शेव, दही व कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.
ढोकलीची भाजी
साहित्यः ढोकलीसाठीः 50 ग्रॅम बेसन, पाव टीस्पून हळद, 1 उकडून कुस्करलेला बटाटा, अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरचीपूड, चिमुटभर हिंग, 3 टीस्पून तेल, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.
इतर साहित्यः 2 बटाटे, 1 वांग, 50 ग्रॅम चवळीच्या शेंगा, 3 टीस्पून तेल, चिमूटभर हिंग, 2 टीस्पून लाल मिरची पूड,
1 टीस्पून हळद, 2 टीस्पून धणे पूड, 1 टीस्पून जिरे पूड, 1 टीस्पून बडीशेप पावडर, 50 मि.ली. तेल, मीठ चवीनुसार.
कृतीः ढोकलीचे सर्व साहित्य एकत्र करून पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घ्या. छोटे छोटे वडे बनवून खरपूस तळून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून हिंग व जिर्याची फोडणी द्या. सर्व भाज्या, मसाले व थोडे पाणी टाकून शिजवा. बटाटा मॅश करून भाजीत घालून 3-4 मिनिटे शिजवा. गरम-गरम सर्व्ह करा.