Close

आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता सादर करणार हवेतला योग (‘Premachi Gosht’Fame Mukta Alias Swarada Thigale To Perform Ariel Yoga In Reality Show  ‘Aata Hou De Dhingana’)

स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ताचा आजवर न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी मुक्ता आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर एरियल योग म्हणजेच हवेतला योग सादर करणार आहे. मुक्ताच्या या सादरीकरणाने मंचावर सर्वांनाच अवाक करुन सोडलं आहे.

मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळेने आपल्या वडीलांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या चौथ्या वर्षापासून योगाचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला स्विमिंग आणि योगा असं सत्र चालू असायचं. योगावरच्या याच प्रेमापोटी स्वरदाने म्हैसूर गाठलं आणि महिनाभर अष्टांग योगाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. योगाचे नवनवे प्रकार शिकण्याचा जणू स्वरदाला ध्यास लागला आणि पुण्यातील एका संस्थेतून तिने एरियल योग शिकण्याचं ठरवलं. आता होऊ दे धिंगाणाच्या मंचावर एरियल योग सादर करताना तिच्या मनात थोडं दडपण होतं. मात्र होस्ट सिद्धार्थ जाधव आणि सहकलाकारांनी स्वरदाला प्रोत्साहन दिलं आणि तिने मंचावर अफलातून सादरीकरण केलं.

स्वरदाच्या आयुष्यात अभिनयासोबतच योगसाधनेलाही तितकंच महत्त्वाचं स्थान आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही ती योगसाधनेसाठी वेळ काढतेच. योगसाधनेने तिच्या आयुष्याला वेगळी कलाटणी दिली आहे. प्रत्येकानेच ही कला आत्मसात करायला हवी असं स्वरदाला वाटतं.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/