लग्नसराईचा हंगाम यंदा जोरात आहे. या हंगामात नववधूने पोशाख आणि दागिन्यांबरोबरच केसांची निगा राखणे व आकर्षक केशभूषा करणे गरजेचे असते. त्या संदर्भात गोदरेज प्रोफेशनलचे नॅशनल टेक्निकल हेड शैलेश मूल्य यांनी काही चांगल्या टिप्स दिल्या आहेत. त्यांच्या मते नववधूच्या पोशाखाचा मुकुटमणी म्हणजे तिची केशरचना. तेव्हा विवाहपूर्वी केसांची निगा कशी राखावी याबद्दल शैलेश यांनी दिलेल्या या खास टिप्स :
१) चांगली हेअर स्टाईल करण्यासाठी तुमचे केस योग्य आहेत की नाही, ते पाहा. केस निरोगी असतील तर त्यापासून तुम्ही आकर्षक हेअर स्टाईल करू शकता. डीप कंडिशनिंग ट्रीटमेंटने केसांचे उत्तम पोषण करा. त्याने केस चमकदार व तयार होतील.
२) केसांची टोके फाकलेली असतील तर ते निस्तेज दिसू शकतात. तेव्हा लग्नाआधी ते ट्रिम करून घ्या. अगदी काही इंचाने कमी केलेत तरी त्यांची एकूणच शोभा वाढेल.
३) तुमचे केस आकर्षक दिसावे म्हणून दर्जेदार प्रॉडक्ट्स वापरा. केसांचा पोत बघून चांगल्या दर्जाचे शाम्पू व कंडिशनर खरेदी करा. केसांना आकार देण्यासाठी ते गरम करणारी उपकरणे वापरली जातात. त्याची उष्णता रोखण्यासाठी संरक्षक स्प्रे वापरा.
४) हेअर स्टाईलसाठी सुशोभित पिना, क्लिप्स, फ्लॉवर क्राऊन आणि कंगवे यांचा वापर केला जातो. तेव्हा केस व पोशाखाला शोभतील अशा एक्सेसरीज वापरा.
५) प्रत्यक्ष विवाह समारंभा आधी खरेदी वा नातेवाईक यांना भेटण्याच्या निमित्त बाहेर फिरावे लागते. तेव्हा ऊन, वारा, पाऊस यापासून केसांचा बचाव करा. हॅट, टोपी, स्कार्फचा वापर करा आणि युव्ही लिव्ह इन कंडिशनर वापरा.