Close

बटाटे कॉर्न पॅटीस आणि शाही बटाट्याचे भरीत (Potato Corn Patties And Mashed Potatoes)

बटाटे कॉर्न पॅटीस आणि शाही बटाट्याचे भरीत
साहित्य: 100 ग्रॅम उकडलेले बटाटे, 50 ग्रॅम उकडलेले मक्याचे दाणे, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, अर्धा अर्धा टीस्पून जिरे पावडर, चाट मसाला, लाल तिखट, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ
कृती: एका भांड्यात पॅटीसचे सर्व साहित्य एकजीव करुन पॅटीस बनवा. कढईत तेल गरम करून पॅटीस सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. पॅटीस एका प्लेटमध्ये कापून ठेवा. रायता आणि तिखट-गोड चटणी बरोबर सर्व्ह करा.

शाही बटाट्याचे भरीत
साहित्य: 4 उकडलेले बटाटे, 1 चमचा तेल,1 चमचा जिरे, 2 चिरलेले कांदे, 2हिरव्या मिरच्या चिरलेल्या, चवीनुसार मीठ, गरम मसाला पावडर, चिरलेली कोथिंबीर, कोळशाचा तुकडा,1 टीस्पून तूप.
कृती : बटाटे सोलून चांगले मॅश करा. कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला. आता कांदे आणि हिरवी मिरची 4-5 मिनिटे परतून घ्या. मॅश केलेले बटाटे आणि मसाले घालून ढवळा. विस्तवावर दोन-तीन कोळशाचे निखारे गरम करा. कोळसा गरम झाल्यावर हीटप्रूफ डब्यात ठेवा. आता हा डबा तयार भरीतावर ठेवा. कोळशावर तूप सोडून कढई झाकून ठेवा आणि जेव्हा कढईत कोळशाचा धूर भरले तेव्हा झाकण काढून गरमागरम सर्व्ह करा.

Share this article