Close

पूनमचा डाव तिच्यावरच पलटी, निधनाची बातमी पसरणाऱ्या कंपनीने केली कायदेशीर कारवाई ( Poonam Pandey Stakeholders Sent Her Legal Notice For Fake Death News)

पूनम पांडेने अलीकडेच आपल्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली होती. त्यावरुन सर्वत्र खळबळ माजली, पण नंतर आपण जीवंत असल्याचे एका लाइव्ह मध्ये सांगत सर्वाइकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी हा खटाटोप केल्याचे समोर आले. पण नंतर सर्वाइकल कॅन्सर संबंधित सर्व पोस्ट डिलीट करण्यात आल्या आणि लवकरच सत्य बाहेर येईल, असे तिने म्हटले. आता पूनमने एक नवीन पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिने आपल्या स्टेकहोल्डर्सवर गंभीर आरोप केले आहेत.

पूनम पांडेने दावा केला की, खोट्या मृत्यूच्या स्टंटमध्ये सहभागी असलेल्या स्टेकहोल्डर्सनी तिच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, खरं काय ते समोर येईल म्हटल्यावर स्टेकहोल्डर्सचे धाबे दणाणले आहे. उलट त्यांनीच आम्हाला कायेदशीर नोटीस पाठवली.. तिने कॅप्शनमध्ये हात जोडणारा इमोजी देखील शेअर केला आहे.

२ फेब्रुवारीला पूनम पांडेच्या 'मृत्यू'ची बातमी इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आली होती. त्यात तिचा मृत्यू सर्वाइकल कॅन्सरमुळे झाला असल्याचे लिहिलेले. या  घटनेच्या २४ तासांनंतर, अभिनेत्रीने एक व्हिडिओ बनवून आपण जीवंत असल्याचे आणि हे सर्व सर्वाइकल कॅन्सरच्या जनजागरूकतेसाठी केल्याचे सांगितले.

या घटनेनंतर काहींनी तिच्याविरुद्ध एफआयआरही दाखल केला. फैजान अन्सारीने अभिनेत्री आणि तिचा एक्स पती सॅम बॉम्बे यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. पूनम पांडेवर कॅन्सरचे गांभीर्य शुल्लक करून आपल्या मृत्यूचा बनाव करून लाखो लोकांच्या भावना दुखावल्याचा आणि त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/