Close

पोंगल घी खिचडी (Pongal Ghee Khichdi)

साहित्य : 1 कप तांदूळ, अर्धा कप मूगडाळ, थोडे कढीपत्ते, 4 टेबलस्पून तूप, चिमूटभर हिंग, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून काळी मिरीची जाडसर पूड, 1 आल्याचा तुकडा किसलेला, अर्धा कप काजू (थोडे काजू सजावटीसाठी बाजूला ठेवा).
कृती : एका पॅनमध्ये तांदूळ आणि डाळ पाच मिनिटं भाजून घ्या. नंतर त्यात 2 टेबलस्पून तूप मिसळून पुन्हा दोन मिनिटं भाजून घ्या. पॅन आचेवरून खाली उतरवून ठेवा. कुकरमध्ये चार ग्लास पाणी, मीठ, जिरं आणि भाजलेले डाळ-तांदूळ घालून दोन शिट्या होईपर्यंत शिजवा. आच बंद करून कुकर थंड होऊ द्या.
आता एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी, हिंग, काजू आणि कढीपत्ते घालून सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतवा. त्यात काळी मिरी पूड आणि शिजवलेली खिचडी घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. पोंगल घी खिचडी गरमागरम सर्व्ह करा.

Share this article