Close

पोळीची भाजी व डाळीचे ढोकरे (Polchi Bhaji And Dal Dhokra)

पोळीची भाजी
साहित्य: 6-8 पोळ्या, 2 कप ताक, 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून राई, चिमूटभर हिंग, 1 टेबलस्पून एव्हरेस्ट काश्मिरी लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार.
कृती: पोळी चौकोनी किंवा शंकरपाळीच्या आकारात कापून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून राई टाका. हिंग, एव्हरेस्ट लाल मिरची पूड व ताक घाला. आता यात पोळीचे केलेले तुकडे घाला. नंतर हळद व मीठ टाका. एक उकळी येऊ द्या. शिजल्यावर गरम-गरम सर्व्ह करा.

डाळीचे ढोकरे
साहित्य: 2 कप भिजवलेली चणा डाळ, 1 चौकोनी तुकडे केलेला बटाटा, 1 टीस्पून गरम मसाला , 1 टेबलस्पून धण्याची पेस्ट, 1 टेबलस्पून धणे-जिरे पूड, पाव टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून हळद, पाव कप दही, 2 टेबलस्पून आलं पेस्ट, 3 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून तूप, मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी.
कृती: चणाडाळ, आलं, मीठ व हिरवी मिरची एकत्र करून वाटून घ्या. गरम मसाला, जिरे व धणे एकत्र भाजून वाटा. कढईत तेल गरम करून चणा डाळीचे मिश्रण त्यातील पाणी आटेपर्यंत परतून घ्या. हे मिश्रण तेल लावलेल्या ताटात पसरवा. शंकरपाळीच्या आकारात कापून खरपूस तळून घ्या. कापलेले बटाटे डीप फ्राय करा. उरलेल्या तुपात आलं पेस्ट, भाजलेले गरम मसाले, धणे-जिरे पूड, लाल मिरची, मीठ व दही टाकून परतून घ्या. तळलेले बटाटे व पाणी टाकून शिजवून घ्या. तळलेले ढोकरे टाका. 2-3 मिनिटे शिजवा. ढोकरे शिजल्यानंतर तूप व गरम मसाला टाका. भातासोबत गरम-गरम सर्व्ह करा.

Share this article