परिपूर्ण व्हॅलेंटाइन्स डे गेटवेचे नियोजन करण्यासाठी वेळ नाही आहे का? व्हिसा अधिक बचत करणाऱ्या टिप्स सांगत आहे, ज्यामुळे तुम्ही त्वरित व संस्मरणीय गेटवेचे नियोजन करू शकता, जे किफायतशीर व रोमँटिक असेल.
• कमी ज्ञात ठिकाणे निवडा: नेहमीची, गर्दीची पर्यटन स्थळे सोडून कमी ज्ञात ठिकाणे निवडा. अज्ञात ठिकाणांचा शोध घ्या, जी सहसा अधिक उत्साहवर्धक अनुभव देतात आणि किफायतशीर असतात, ज्यामुळे प्रवास आणि निवास या दोन्ही बाबींसंदर्भात बचत होईल.
• जोडप्यांसाठी असलेल्या ऑफर्स शोधा: अनेक ठिकाणी जोडप्यांसाठी सर्वसमावेशक रोमँटिक पॅकेजेस उपलब्ध असतात, ज्यामध्ये जेवण, ऍक्टिव्हिटीज आणि अनोखे अनुभव यांचा समावेश असतो. हे पॅकेजेस् उत्तम मूल्य देऊ शकतात, अतिरिक्त खर्च न करता तुम्हाला कायमस्वरूपी आठवणींचा संग्रह करण्यास मदत करतात.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/image-46-800x450.png)
• बचत वाढवण्यासाठी क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स वापरा: प्रवासाला अधिक बजेट-अनुकूल बनवण्यासाठी प्रवासाशी संबंधित खर्चासाठी तुमच्या व्हिसा कार्डवरील विशेष ऑफर, जसे बोनस पॉइण्ट्स किंवा कॅशबॅकचा फायदा घ्या!
• पर्यायी निवास पर्यायांचा विचार करा: हॉटेल बुक करण्याऐवजी व्हेकेशन रेण्टल्स किंवा खाजगी रूम्स असलेल्या हॉस्टेल्सचा विचार करा. हे बहुतेकदा खिशाला अधिक परवडणारे असू शकतात आणि तुम्हाला व तुमच्या जोडीदाराला अनोखा किंवा वैयक्तिकृत अनुभव देऊ शकतात.
• सोप्या पेमेंटसाठी कॉन्टॅक्टलेस पेमेंट्स वापरा: तुम्ही स्टोअरमध्ये प्रत्यक्ष पेमेंट करत असाल तर कॉन्टॅक्टलेस कार्ड पेमेंट्सचा वापर करा. ते जलद, सुरक्षित आहेत, ज्यामुळे तुमचे प्री-ट्रिप खर्च व्यवस्थापित करणे सोपे होते.
प्रेमासाठी मोठी किंमत मोजावी लागत नाही! या टिप्ससह, तुम्ही शेवटच्या क्षणी नियोजन केलेला व्हॅलेंटाईन डे किफायतशीर आणि संस्मरणीय बनवू शकता.