Close

पितृ पक्ष २०२४ (Pitru Paksha 2024)

अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवडा असतो. प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्ये  केली जात नाहीत. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. ‘श्रद्धा’ या शब्दापासून ‘श्राद्ध’ हा शब्द निर्माण झाला आहे. ईहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाढवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले, त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते, असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यांसारख्या ग्रंथांत आढळून येतो. त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख, शांतता, समृद्धी, कायम राहते अशी मान्यता आहे.

पितृ पक्ष २०२४ महत्वाच्या तारखा

पंचांगानुसार, दरवर्षी भाद्रपद मासात पितृपक्ष प्रारंभ होतो आणि तो १६ दिवस राहतो. याच कालावधीत पितरांच्या शांतिसाठी श्राद्ध, तर्पण, पिंडदान केलं जातं. या काळात श्राद्ध घातल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो, तसेच व्यक्ती पितृदोषापासून मुक्त होतो आणि त्याच्या घरात सुख-समृद्धी नांदते. त्यासाठी पुर्वजांच्या मृत्यू तिथीनुसार श्राद्ध घातले पाहिजे, यानुसार आजपासून सुरू झालेल्या श्राद्धाच्या महत्त्वाच्या तारखा जाणून घेऊया.

प्रष्टपदी/पौर्णिमा श्राद्ध : मंगळवार १७ सप्टेंबर

प्रतिपदा श्राद्ध : बुधवार १८ सप्टेंबर

द्वितीयेचे श्राद्ध : गुरुवार १९ सप्टेंबर

तृतीयेचे श्राद्ध : शुक्रवार २० सप्टेंबर

चतुर्थी श्राद्ध : शनिवार २१ सप्टेंबर

पंचमी श्राद्ध : रविवार, २२ सप्टेंबर

षष्ठीचे श्राद्ध आणि सप्तमीचे श्राद्ध: सोमवार २३ सप्टेंबर

अष्टमी श्राद्ध : मंगळवार २४ सप्टेंबर

नवमी श्राद्ध : बुधवार २५ सप्टेंबर

दशमी श्राद्ध : गुरुवार २६ सप्टेंबर

एकादशी श्राद्ध: शुक्रवार २७ सप्टेंबर

द्वादशीचे श्राद्ध : रविवार २९ सप्टेंबर

माघाचे श्राद्ध : रविवार २९ सप्टेंबर

त्रयोदशीचे श्राद्ध : सोमवार ३० सप्टेंबर

चतुर्दशीचे श्राद्ध : मंगळवार १ ऑक्टोबर

सर्व पितृ अमावस्या : बुधवार २ ऑक्टोबर

Share this article