अननसाचे आईस्क्रीम
साहित्यः 1 अननस, 2 वाट्या क्रीम, अर्धी वाटी साखर, 2 थेंब पाईनॅपल इसेन्स, 3 मोठे चमचे दुधाची पावडर, 1 लिंबाचा रस, सजावटीसाठी जॅम
कृतीः अननस सोलून त्याचे तुकडे करून मिक्सरमधून गर तयार करा. साखर व दूध पावडर एकत्र करून अननसाच्या गरात घालून मिश्रण एकजीव होईपर्यन्त ढवळा व सेट होण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवा. आईस्क्रीम अर्ध सेट झाल्यावर बाहेर काढून पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घ्या. क्रीममध्ये लिंबाचा रस व इसेन्स घालून चांगले फेटा व आईस्क्रीममध्ये टाकून एकजीव करा. पुन्हा फ्रिजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवा. तयार आईस्क्रीम, जॅमने सजवून सर्व्ह करा.
पपई आईस्क्रीम
साहित्यः अर्धा लिटर दूध, 2 वाट्या क्रीम, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 2 वाटी पपई गर, 2 वाट्या साखर, मिक्स फ्रूट इसेन्स.
कृतीः दुधात साखर व कॉर्नफ्लोअर घालून उकळून थोडे घट्ट करावे. थंड झाल्यावर मलई, पपईचा गर घालून मिक्सरमधून घुसळावे. सेट करावे. फ्रिजरमध्ये ठेवून तासाभराने बाहेर काढून इसेन्स घालून पुन्हा घुसळावे. परत सेट होण्यासाठी ठेवावे.