साहित्य :
- १ कप शिजवलेला भात
- १-१ टेबलस्पून तेल आणि पेरी-पेरी मसाला
- १ टीस्पून बारीक चिरलेले लसूण
- २ हिरव्या मिरच्या
- प्रत्येकी १/४-१/४ कप चिरलेल्या भाज्या (फरसबी, सिमला मिरची, उकडलेले मक्याचे दाणे)
- अर्धा कप बारीक चिरलेले गाजर
कृती :
- एका पॅनमध्ये तेल गरम करून लसूण आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या.
- नंतर चिरलेल्या सर्व भाज्या घालून मोठ्या आचेवर नरम होईपर्यंत परतून घ्या.
- आता शिजवलेला भात, पेरी-पेरी मसाला, लिंबाचा रस आणि मीठ घालून व्यवस्थित परतून घ्या.
- गरम-गरम सर्व्ह करा.
Link Copied