साहित्यः 2 बटाटे ( उकडून स्मॅश केलेले), 2 टेबलस्पून उकडलेले शेंगदाणे, प्रत्येकी एक टेबलस्पून उकडलेले काजू व तूप, 1 टीस्पून जिरे, 2 हिरव्या मिरच्या, 500 मि.ली. पाणी, मीठ चवीनुसार, 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट. कृतीः पॅनमध्ये तूप गरम करून जिरे व कढीपत्त्याची फोडणी द्या. कुस्करलेला बटाटा, मीठ, शेंगदाणे, काजू व गरजेनुसार पाणी घालून एक उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर त्यात शेंगदाण्याचा कूट घालून घट्ट होईपर्यंत उकळी येऊ द्या.
Link Copied