Close

“दिवाळीच्या गृहपाठाची वाट पाहायची मी, कारण… पारु फेम अभिनेत्रीने सांगितले दिवाळीची आठवण ( Paru Fame Sharayu Sonawne Share Her Diwali Memory)

सर्वांची लाडकी 'पारू' म्हणजेच शरयू सोनावणे , दिवाळीच्या आठवणींना उजाळा देत सांगितले, "लहानपणी शाळेत दिवाळीची सुट्टी मिळायची आणि त्यासोबत सुट्टीचा गृहपाठ ही मिळायचा. मला सर्वात जास्त गंमत तो गृहपाठ सुट्टीच्या पहिल्याच दिवशी पूर्ण करण्यात होती. मी कधीही अभ्यासात मागे नव्हते. माझं असं असायचं कि कधी सुट्टी पडतेय आणि भरपूर गृहपाठ मिळतोय आणि मी तो त्याच दिवशी घरी जाऊन पूर्ण करतेय याची मला घाई लागलेली असायची.

ही आठवण माझ्या सर्वात जवळची आहे. गृहपाठ पूर्ण केल्यावर बाकीचे दिवस शॉपिंग करायची मनासारख्या कपड्यांची, मज्जा करायची दिवाळीच्या दिवशी पहाटे ४-५ वाजता उठायचं, नवीन कपडे घालायचे, आई- मोठी बहीण दारात रांगोळी काढायच्या. मग एक फेरफटका मारायचो शेजाऱ्यांच्या रांगोळ्या आणि तोरण बघण्यासाठी. मला पहिली पहाट, अभ्यंगस्नानाचा मला प्रचंड आवड कारण एक वेगळीच ऊर्जा असायची. मी दिवाळीच्या तुडतुडी या फटाक्यासारखी आहे असं मला वाटतं. तुडतुडी कशी पेटल्यावर तुडतुड आवाज येतो आणि छान रंग येतात तशीच मी आहे.

जीवाला बिलकुल शांतता नसते. तशी मी गप्प असते पण जर कुठची गोष्ट हातात घेतली तर ती मी पूर्ण केल्या शिवाय शांत बसूच शकत नाही. दिवाळीत जे चटपटीत आणि तिखट पदार्थ आहेत मी त्यांच्यासारखी आहे. म्हणजे तिखट शेव , मक्याचा आणि पोह्याचा झणझणीत चिवड्या सारखी . दिसायला आणि स्वभावाने जरीही मी लाडवा सारखी गोड असेन पण माझा मूळ स्वभाव तिखट शेवे सारखा आहे."

बघायला विसरू नका तुमच्या लाडक्या 'पारू' च्या आयुष्यात या दिवाळीत काय घडणार आहे दररोज संध्या ७:३० वा. फक्त झी मराठीवर

Share this article