पनीर मटार
साहित्य: 100 ग्रॅम मटार, 100 ग्रॅम पनीर, 2 उभे व पातळ चिरलेले कांदे, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 2-3 हिरव्या मिरच्या, 3 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून कसुरी मेथी, मीठ चवीनुसार, चिरलेली कोथिंबीर व बटर.
कृती: मटार उकडून घ्या. पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून लसूण, हिरवी मिरची, कांदा टाकून परतून घ्या. चिरलेला टोमॅटो टाका. तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. यात हळद, मीठ, लाल मिरची पूड, चाट मसाला, कसुरी मेथी टाकून परतून घ्या. उकडलेले मटार व पनीरचे तुकडे टाका. कोथिंबिरीने सजवून गरम-गरम सर्व्ह करा.
गाजर व चिली
साहित्यः 250 ग्रॅम गाजर, 3 हिरव्या मिरच्या, 2 टीस्पून तेल, 1 टीस्पून राई, 5-6 कढीपत्ता, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, 1 टीस्पून लिंबाचा रस.
कृतीः गाजर किसून घ्या. मिरचीचे दोन भाग करा. पॅनमध्ये तेल गरम करून राईची फोडणी द्या. त्यात कढीपत्ता व हिरवी मिरची टाका. गाजर, हळद व मीठ टाकून 3-4 मिनिटे शिजवा. लिंबाचा रस टाका.