साहित्य : अर्धा किलो पारीसाठी मळलेलं पीठ, 2 वाटी किसलेलं पनीर, 3 लहान चमचे गुळाची पूड, 1 वाटी सुका मेवा, 5 चमचे तूप. कृती : पनीर आणि सुकामेवा एकत्र कालवा. त्यात गूळ घालून साधारण एकत्र करा. आता पारीच्या पिठाच्या साधारण पाच लहान पुर्या लाटा. या पुर्यांवर आतल्या बाजूला तुपाचा ब्रश फिरवा. आता त्यावर पनीरचं सारण ठेवून बंद करा आणि करंजी तयार करा. बेकिंग ट्रेवर तुपाचा हात फिरवून, त्यावर करंज्या व्यवस्थित रचून ठेवा. या करंज्यांवरही ब्रशच्या साहाय्याने तूप लावा. या करंज्या प्रीहिटेड ओव्हनमध्ये कमी तापमानावर जास्त वेळ शेकून घ्या.
Link Copied