साहित्य: अर्धा कप कापलेली फरसबी, अर्धा कप तुरीच्या शेंगा, अर्धा कप कांदा, 6-8 बेबी पोटॅटो, अर्धा कप उकडलेले मटार, 1 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून राई, पाव टीस्पून हिंग, 2 टीस्पून आलं-मिरची पेस्ट, चिमूटभर हळद, 2 टीस्पून धणे-जिरे पूड, अर्धा कप किसलेला नारळ, अर्धा कप कोथिंबीर, 1 टीस्पून साखर, 2 टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार.
मेथी मुठियासाठी: पाव कप मेथी, पाव कप बेसन, अर्धा टेबलस्पून बेसन, अर्धा टीस्पून आलं-मिरची पेस्ट, चिमूटभर एव्हरेस्ट हिंग, मीठ चवीनुसार, 1 टेबलस्पून तेल, तळण्यासाठी तेल.
कृती: मेथी मुठिया: सगळे साहित्य एकत्र करून मळून घ्या. गरज असल्यास पाणी टाका. लांबट गोल आकाराचे गोळे बनवून तळून घ्या. शाक बनवण्याची कृती: कढईत तेल गरम करून राई व एव्हरेस्ट हिंगाची फोडणी द्या. मटार व्यतिरीक्त सगळ्या भाज्या टाका. मीठ, हळद, आलं-लसूण-मिरचीची पेस्ट, धणे-जिरे पूड व दोन कप पाणी टाकून मंद आचेवर शिजवा. सगळ्या भाज्या शिजल्यानंतर मटार, मुठिया, साखर व कोथिंबीर टाकून काही मिनिटे शिजवा. कोथिंबीर व खोबर्याने सजवून सर्व्ह करा.
पंचकुटी शाक (Panchkuti Vegetable)
Link Copied