Close

पंचरत्न शाक (Pancharatna Shaka)

साहित्य : अर्धा कप फरसबी 1 इंच तुकड्यात कापून घ्या, अर्धा कप तुरीची भाजी, अर्धा कप कांदे, 6-8 लहान सोलून कापलेले बटाटे, अर्धा कप उकडलेले हिरवे वाटाणे, 1 टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून हिंग, 2 टीस्पून आले - लसूण - हिरवी मिरची पेस्ट चिमूटभर हळद, 2 टीस्पून धणे - जिरे पूड, अर्धा कप किसलेले खोबरे, अर्धी वाटी कोथिंबीर, 1 टीस्पून साखर, 2 टीस्पून तेल, चवीनुसार मीठ,

मेथी मुटक्यांसाठी : 1/4 वाटी मेथीची पाने, 1/4 वाटी बेसन,अर्धा चमचा गव्हाचे पिठ,अर्धा चमचा आले-हिरवी मिरची पेस्ट,1 चमचा तेल, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : मेथी मुटक्यांसाठी: सर्व साहित्य एकत्र मळून घ्या (आवश्यकतेनुसार पाणी घाला). आता त्याचे 8-10 भाग करा आणि लांब रोल करा आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा.
शाक बनवण्याची पद्धत: कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि हिंग टाका. हिरवे वाटाणे सोडून बाकी सर्व भाज्या घाला, मीठ, हळद, आले-लसूण-मिरची पेस्ट, धने-जिरे पावडर आणि दोन वाट्या पाणी घालून मंद आचेवर शिजवा. भाज्या शिजल्यावर आणि पाणी सुकल्यावर त्यात हिरवे वाटाणे, मुटके, मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून 6-7 मिनिटे शिजवा.

Share this article