पालक सूप
साहित्यः 2 मध्यम पालक जुड्या, 1 लहान कांदा, बारीक चिरून, 1 लहान लसूण पाकळी, 1 लहान उभी चिरलेली हिरवी मिरची, 1 टीस्पून बटर. चिमूटभर दालचिनी पूड किंवा 1 लहान दालचिनीची काडी. चवीपुरते मीठ, काळी मिरी, 2 टेबलस्पून क्रिम.
कृती: पालक निवडून घ्यावा, पाने खुडून घ्यावीत. धुवून ब्लांच करावा. ब्लांच करण्यासाठी पालकाची खुडलेली पाने गरम पाण्यात 2 मिनिटे उकळावीत. गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात घालावीत. सर्व पाणी काढून टाकून मिक्सरमध्ये प्युरी करून घ्यावी. जर आख्खी दालचिनी असेल तर 1 टीस्पून बटरमध्ये दालचिनीची काडी घालून थोडावेळ परतावे. लसूण आणि हिरवी मिरची घालून साधारण 30 सेकंद परतावे. बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईस्तोवर परतावा. पालकाची प्युरी घालून उकळी काढावी. चवीपुरते मीठ घालावे. जर आख्खी दालचिनी सुरुवातीला घातली नसेल तर थोडी दालचिनी पूड घातली तरी चालते, ती आत्ता घालावी. थोडी मिरपूड भुरभुरावी आणि थोडे क्रिम घालून सूप सर्व्ह करावे.