पालक पनीर
साहित्यः 2 जुड्या पालक, 200 ग्रॅम पनीर, 2-3 हिरव्या मिरच्या, 8-10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा टीस्पून जिरे, 4 टेबलस्पून फ्रेश क्रीम, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 3 टीस्पून तेल, मीठ चवीनुसार.
कृतीः पालक वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्या. मीठ घालून उकळलेल्या पाण्यात 2 मिनिटे ठेवा. या पाण्यातून काढून पुन्हा थंड पाण्याने धुवा. हिरवी मिरची पालकासोबत वाटून पेस्ट बनवून घ्या. पनीरचे चौकोनी तुकडे करा. पॅनमध्ये तेल गरम करून जिरे टाका. आता यात लसूण टाकून परतून घ्या. पालक पेस्ट टाकून परतून घ्या. गरज असल्यास पाणी टाका. ग्रेव्हीला उकळी आल्यावर त्यात पनीर टाका. लिंबाचा रस टाकून शिजवून घ्या. फ्रेश क्रीम टाकून गरम-गरम सर्व्ह करा.
ऑग्रेटिन पालक पनीर
साहित्यः 400 मि.ली. दूध, 20 ग्रॅम मैदा, 25 ग्रॅम बटर, पाऊण टीस्पून जायफळ पूड, 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून एव्हरेस्ट सफेद मिरी पूड, थोडेसे मिक्स हर्ब्स.
पालक पनीरसाठीः 1 जुडी पालक, 50 ग्रॅम पनीर, 3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 चिरलेली हिरवी मिरची, 1 टीस्पून मीठ, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोर, प्रत्येकी 1 टेबलस्पून तूप, बटर व क्रीम, 1 टीस्पून लिंबाचा रस.
इतर साहित्यः चीज व मिक्स हर्ब्स.
कृतीः पॅनमध्ये बटर व मैदा टाकून गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या. यात दूध घालून सतत ढवळत राहा. मीठ व एव्हरेस्ट सफेद मिरी पूड टाका. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. व्हाइट सॉस तयार आहे. पालक धुवून कापून घ्या. काही वेळ पाण्यात ठेवून वाटून पेस्ट बनवून घ्या. कॉर्नफ्लोर शिजेपर्यंत मंद आचेवर परतून घ्या. कॉर्नफ्लोर करपणार नाही याची काळजी घ्या. आलं, लसूण व हिरवी मिरची वाटून पेस्ट बनवून घ्या. पॅनमध्ये तूप गरम करून आलं, लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून परतून घ्या. चिरलेला कांदा घालून परतून घ्या. पालक, पनीर, कॉर्नफ्लोर, मीठ व क्रीम टाकून शिजवा. शेवटी बटर व लिंबाचा रस टाका. डिशमध्ये पालक पनीर ठेवून त्यावर व्हाइट सॉस टाकून. किसलेले चीज व मिक्स हर्ब्स टाकून मायक्रोव्हेव किंवा ओव्हनमध्ये 180 डिग्री वर 15 मिनिटे बेक करा. गार्लिक ब्रेडसोबत सर्व्ह करा.