Close

तुला जपणार आहे मालिकेसाठी कशी झाली नीरज गोस्वामीची निवड, सारं काही तिच्यासाठीनंतर पुन्हा झीवर संधी ( Niraj Goswamy Share How His Audition Done For Tula Japnar Ahe New Serial)

अभिनेता नीरज गोस्वामी "तुला जपणार आहे" मालिकेत अथर्वची भूमिका साकारत आहे. नीरजने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अनेक गोष्टींना उजाळा दिला. ."माझ्या भूमिकेचं नाव अथर्व आहे. अथर्वच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर त्याची सध्याची मनस्थिती अशी आहे की, त्याच्या आयुष्यात एक खूप मोठं दुःख आहे. त्याची बायको अंबिका एका अपघातामध्ये जाते. त्याच्याशी जोडलेला एक ओपन एंडेड प्रश्न आहे की त्याला त्या ऍक्सीडेन्ट बद्दल १००% माहिती नाही की तो कसा झाला. त्याला एक विचार सतत खात आहे की त्याची मुलगी त्याच्याशी बोलत नाही, त्याच्याकडे बघतही नाही.

अथर्व त्या गरजेला कसं पूर्ण करणार हा मालिकेमध्ये त्याचा प्रवास असणार आहे. या मालिकेत बरेच VFX आणि इफेक्ट वापरले जाणार आहेत म्हणून शूट करायची पद्धत जरा वेगळी आहे. माझी या भूमिकेसाठी निवड कशी झाली याचा किस्सा ऐकवायची झाला तर तो असा आहे कि, झी मराठी टीमने मला 'सारं काही तिच्यासाठी' नंतर रिपीट करणं योग्य समजलं त्या बद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझं सिलेक्शन ऑडिशन देऊन झालं आहे. ऑडिशनला एक मोनोलॉग दिला होता आणि माझे इंटरप्रेटेशन डायरेक्टरला आवडली. मग ती ऑडिशन पुढे पाठवली गेली.

झी मराठी टीम माझे नुआन्सेस , डिटेल्स नोटीस करू शकली त्या बद्दल आय फील गुड . अशी ऑडिशनची प्रोसेस होती ज्यातून माझी निवड झाली. प्रोमो बघून आणि जे थोडंफार सीन्स मी करू शकलो आहे, त्यावर मी खात्री देऊ शकतो की प्रेक्षक शर्वरी लोहकरे , ऋचा गायकवाड , प्रतीक्षा शिवणकर , सिद्धीरूपा करमरकर, संदेश उपश्याम सारख्या कलाकारांच्या प्रेमात पडतील. हे सर्व उत्तम कलाकार आणि त्यांच्या व्हर्साटिलिटीचा आनंद ऑडियन्सला घेता येणार आहे.

जेव्हा प्रोमो बाहेर आला तेव्हा अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. एकूणच प्रोमोचा चांगला रिस्पॉन्स आहे. खूप सिनेमा सारखा आणि टॉप नोच पद्धतीने शूट केलं गेले आहे. अशी एक सर्वांची कॉमन रिएक्शन बघायला मिळत आहे. फँटसी, फिक्शन- ड्रॅमा असा जॉनर असलेला हा शो आहे. खूप रिसर्च आणि मेहनत घेणारी चॅनेलची टीम आहे तर प्रॉडक्ट हाय क्वालिटी असणार आहे आणि मला विश्वास आहे की ऑडियन्सला हा शो नक्की आवडणार आहे. रात्री १०:३० चा स्लॉट असल्यामुळे सगळी घरची आणि ऑफिसची काम झालेली असतील, तर प्रेक्षकांना फक्त टीव्ही ऑन करून बसायचं आहे आणि मनोरंजनाचा आनंद घ्यायचा आहे!

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/