Close

जलसामध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली बच्चन कुटुंबाची होळी, नव्याने शेअर केले खास फोटो ( Navya Naveli Nanda Share Inside Pics Of Bachchan Family Holi)

प्रत्येकजण होळीच्या रंगात आणि आनंदात मग्न असल्याचे पाहायला मिळत आहे. २४ मार्च रोजी होळी साजरी झाली. बच्चन कुटुंबानेही ती मोठ्या थाटामाटात साजरे केले. घराच्या अंगणात होळी जाळली गेली. अमिताभ यांच्या नातीने होळीचे फोटो शेअर केले आहेत. ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चन यांच्यासह सर्वांनी होळी दहन केले आणि गुलालाची उधळण केली.

नव्या नवेली नंदाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती पेटलेल्या होळीसमोर उभी राहून पोज देत आहे. मामा अभिषेक बच्चन आणि मामी ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासह ती गुलाल लावून कुटुंबातील सर्व सदस्यांचे आशीर्वाद घेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्यासोबतच जया बच्चन आणि अमिताभ यांनीही एकत्र होलिका दहनाची पूजा केली.

अमिताभ बच्चन दरवर्षी त्यांच्या घरी होळी साजरी करतात.  यावेळी होलिका दहनपूर्वी अमिताभ बच्चन यांनीही घराबाहेर जमलेल्या चाहत्यांची भेट घेतली. अमिताभसोबत 'बच्चनवाली होळी' साजरी करण्यासाठी ते आले होते. अमिताभ बच्चन यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.

त्याच वेळी, अमिताभ बच्चन यांनी एकदा सांगितले होते की त्यांची सर्वात अविस्मरणीय होळी अलाहाबादमध्ये होती, जेव्हा ते आपल्या आई वडीलांसोबत खूप खेळायचे. अमिताभ यांनी 2016 मध्ये त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की, बाबूजी तेव्हा अलाहाबाद विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात शिकवायचे. होळीच्या दिवशी सर्व विद्यार्थी घरी यायचे आणि तिथे खूप नाच-गाणे असायचे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/