साहित्य: प्रत्येकी 100 ग्र्रॅम फ्लॉवर, गाजर, मटार व कोबी, 50 ग्रॅम पनीर, 50 ग्रॅम चीज.
ग्रेव्हीसाठी: 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम खसखस, 100 ग्रॅम सफेद तीळ, 2-3 लसणाच्या पाकळ्या, 2-3 बारीक चिरलेली मिरची, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून एव्हरेस्ट कसुरी मेथी, 1 टीस्पून लाल मिरची पूड, मीठ चवीनुसार, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोर, 1 टेबलस्पून क्रीम किंवा बटर.
कृती: सगळ्या भाज्या कापून उकडून घ्या. व्यवस्थित मॅश करा. फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून कोफ्ते बनवून तळून घ्या.
ग्रेव्ही: काजू, सफेद तीळ व खसखस पाण्यात उकडून घ्या व मिक्सरमध्ये वाटून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून बारीक चिरलेला लसूण, कांदा व हिरवी मिरची टाकून परतून घ्या. बारीक चिरलेले टोमॅटो टाकून परतून घ्या. काजू, तीळ, खसखसची पेस्ट टाका. यात चाट मसाला, एव्हरेस्ट कसुरी मेथी, लाल मिरची पूड, गरम मसाला व मीठ टाका. क्रीम किंवा बटर टाका. चीज टाका. बनवलेले कोफ्ते ग्रेव्हीत टाका. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.
नर्गिस कोफ्ता (Nargis Kofta)
Link Copied