मशरूम विथ मटार मसाला
साहित्य: 75 ग्रॅम मशरूम, 75 ग्रॅम मटार, 1 दालचिनीचा तुकडा, 2 छोट्या वेलच्या, 1 कांदा, 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, 1 टोमॅटो, प्रत्येकी अर्धा टीस्पून हळद, लाल मिरची, धणे व एव्हरेस्ट गरम मसाला पूड, 30 ग्रॅम काजू-मगज पेस्ट, 2 टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार.
कृती: कांदा बारीक चिरून घ्या. मशरूम धुवून त्याचे चार तुकडे करा. पॅनमध्ये तेल गरम करून दालचिनी, वेलची व कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. लसूण पेस्ट टाका. सर्व मसाले टाका. चिरलेला टोमॅटो टाका. एक कप पाण्यात काजू व मगज उकडून त्याची पेस्ट बनवून यात टाका. मशरूम व मटार टाकून शिजवा. गरम-गरम सर्व्ह करा.
पनीर भुर्जी
साहित्यः 100 ग्रॅम पनीर, 50 ग्रॅम मटार, 3 टीस्पून तेल, 1 टीस्पून जिरे, 2 बारीक चिरलेले कांदे, 3 बारीक चिरलेले टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, 1 टीस्पून काश्मिरी लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून कोथिंबीर.
कृतीः पनीर कुस्करून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून जिर्याची फोडणी द्या. कांदा टाकून परतून घ्या. टोमॅटो टाका. इतर मसाले टाकून 3-4 मिनिटे परता. थोडेसे पाणी व मटार टाका. झाकण ठेवून शिजवा. पनीर टाका. गरज असेल तर पाणी टाका व शिजवून घ्या. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.