Close

मूर्ग भुना मसाला (Murgh Bhuna Masala)

मूर्ग भुना मसाला


साहित्य : अर्धा किलो चिकनचे तुकडे, 4-5 टोमॅटो (बारीक चिरून), 1 लहान आल्याचा तुकडा (बारीक चिरून), 4-5 लसणाच्या पाकळ्या (बारीक चिरून), 2 टीस्पून आले-लसूण पेस्ट, 2-3 हिरव्या मिरच्या (लांबट चिरलेल्या), 2 टीस्पून धणे व अख्खी लाल मिरचीची भाजून केलेली भरड, 1 लहान जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली), अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून कसुरी मेथी, चिमूटभर काळे मीठ, चवीनुसार मीठ, 4-5 टीस्पून तूप.

कृती : चिकनला आले-लसूण पेस्ट व मीठ चोळून किमान अर्धा-एक तासाकरिता झाकून ठेवा. कढईत तूप गरम करून त्यात आले व लसणाचे बारीक चिरलेले तुकडे घाला. ते छान तांबूस रंगाचे झाल्यावर, त्यात हिरवी मिरची व टोमॅटो घालून परतवा. नंतर त्यात धणे-लाल मिरचीची भरड घाला. मसाला छान परतल्यावर त्यात चिकन घालून सतत ढवळत राहा. त्यात आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून चिकन शिजवून घ्या. चिकनला मसाला जवळपास पूर्णपणे चिकटला पाहिजे. चिकन शिजल्यानंतर त्यात गरम मसाला, कोथिंबीर व काळे मीठ घालून एकत्र करा आणि गरमागरम सर्व्ह करा.

टीप :
सर्व्ह करताना मूर्ग भुना मसाल्यावर धणे व लाल मिरचीची भरड भुरभुरल्यास, अधिक स्वादिष्टही होते व दिसतेही छान.
यामध्ये जास्त पाणी घालू नका, मसाला घट्टसरच राहायला हवा.
टोमॅटोही अगदी लालबुंद घ्या, म्हणजे रंग छान येईल.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/