Close

रणबीर कपूरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर का चालतात; मुकेश छाबरा यांचा खुलासा (Mukesh Chhabra Names Ranbir Kapoor ‘Number 1′ Star: Fans’ Unmatched Craze)

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘सांवरिया’ या चित्रपटातून रणबीर कपूरने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘बर्फी’, ‘वेक अप सीड’, ‘तमाशा’ , ‘रॉकस्टार’, ‘संजू’, ‘ये जवानी है दिवानी’ अशा अनेक चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. रणबीर कपूरने आपल्या अभिनयाने एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता दिग्दर्शक-निर्माते मुकेश छाबरा यांनी रणबीरचे सगळे चित्रपट इतके लोकांना का आवडतात, सोशल मीडियाच्या काळातदेखील रणबीर कपूरची लोकप्रियता का आहे, यावर भाष्य केले आहे.

‘पिंकविला’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आता आपल्या आवडत्या कलाकाराविषयी फार काही जाणून घेऊ शकतात. अशा काळात लोकप्रियतेची संकल्पना काय आहे, असा प्रश्न मुकेश छाबरा यांना विचारण्यात आला होता. यावर मुकेश छाबरा यांनी म्हटले आहे की, याबाबतीत बोलायचे तर रणबीर कपूरचे जे लोकांना आकर्षण आहे, त्याची मोहिनी अशी आहे की, लोक त्याला बघण्यासाठी वेडे होतात. त्याचे चित्रपट पाहण्यासाठी लोक जातात. त्याबाबतीत रणबीर कपूर एक नंबरला आहे. त्याची लोकप्रियता टिकून आहे, असे मुकेश छाबरा यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

रणबीर कपूरने याआधी असे सांगितले होते की, तो सोशल मीडिया वापरत नाही, मात्र त्याची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टने ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात रणबीरचे एक सिक्रेट इन्स्टाग्राम अकाउंट असल्याचे उघड केले होते.

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात रणबीर आणि आलिया या जोडीला एकत्र पाहिले गेले होते. दोघांनी काळ्या रंगाचे एकमेकांना मॅचिंग करणारे कपडे परिधान केले होते. याबरोबरच, रणबीर आणि आलिया यांच्या डान्सचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. या संगीत सोहळ्यात ते ‘शो मी द ठुमका’ या गाण्यावर थिरकताना दिसले होते. हे गाणे अरजित सिंह आणि सुनिधी चौहान यांनी गायले आहे.

रणबीरच्या कामाविषयी बोलायचे झाल्यास तो शेवटचा संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असला तरी अनेकांनी या चित्रपटावर टीकादेखील केली होती. आता तो लवकरच नितीश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे; तर संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटातदेखील दिसणार आहे. याबरोबरच रणबीर अनेकदा आपली लाडकी लेक राहामुळेदेखील चर्चेत असतो.

( फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम )

Share this article