गोव्याचा बहुप्रतिक्षित असा वसंतोत्सवातील शिगमोत्सव हा संस्कृती, परंपरा आणि उत्सवाच्या नेत्रदीपक प्रदर्शनासह राज्यात उत्साही वातावरण पसरविण्यास सज्ज आहे. १५ ते २९ मार्च २०२५ या कालावधीत हा उत्सव सुरू होताच, राज्यभरातील विविध शहरांमध्ये गोव्याचा समृद्ध वारसा दर्शविणारे दोलायमान फ्लोट्स, पारंपारिक लोकनृत्य आणि तल्लीन करणाऱ्या मिरवणुका पहायला मिळतील.

१५ मार्च फोंडा येथे या महोत्सवाची सुरुवात होईल, त्यानंतर मडगाव, शिरोडा, डिचोली, वॉस्को, पणजी, म्हापसा, पेडणे इत्यादी प्रमुख शहरातून या मिरवणुकी फुलतील व २९ मार्च रोजी मांद्रे येथे मिरवणुकीची सांगता होईल.
उत्सवाच्या प्रत्येक दिवशी, विविध ठिकाणांवर भव्य परेड आयोजित होईल. अभ्यागतांना गोव्यातील उत्सवांचे सार अनोख्या पद्धतीने अनुभवण्याची संधी मिळेल. ढोल, ताशे यांसारख्या पारंपारिक वाद्याच्या तालापासून ते पारंपारिक वेशभूषेत लोक-कलाकारांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणापर्यंत, शिगम्याचा प्रत्येक क्षण पाहण्यासारखा आहे.

गोव्याचे पर्यटन मंत्री, श्री रोहन ए. खंवटे म्हणाले, कि “शिगमो ही एक अशी वेळ आहे, जेव्हा गोव्याचे सांस्कृतिक सार लोककला सादरीकरण, संगीत आणि आकर्षक फ्लोट परेडद्वारे जिवंत होताना दिसते. राज्याच्या सौंदर्याचा शोध घेताना, अभ्यागतांसाठी अस्सल गोव्याच्या परंपरेमध्ये एकरूप होण्याची ही एक संधी आहे."

गोव्याने जगभरातील प्रवाशांना शिगमो २०२५च्या भव्यतेचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित केले आहे. हा राज्याचा समृद्ध असा सांस्कृतिक वारसा दाखवणारा एक नेत्रदीपक उत्सव आहे.