Close

गायिका मोनाली ठाकूरची लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अचानक तब्येत बिघडली (Monali Thakur’s Health Deteriorated During A Live Concert)

लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अनेक गायकांना अचानक त्रास होऊ लागल्याच्या घटना बऱ्याचदा पाहायला मिळतात. अशीच घटना नुकताच गायिका मोनाली ठाकूरसोबतही घडली आहे. तिलाही लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि तिची तब्येत बिघडली.

ही प्रसिद्ध गायिका आहे मोनाली ठाकूर. लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान गायिका मोनाली ठाकूरची प्रकृती अचानक खालावली. तिला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. मॅनेजर्सने मोनाली गंभीर अवस्थेमध्ये असलेली दिसून आली. त्यामुळे लगेचच तिने परफॉर्मन्स थांबवण्याचा निर्णय घेतला

‘सावर लून’ आणि ‘मोह मोह के धागे’ सारख्या हिट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेली ही गायिका दिनहाटा महोत्सवात गात असताना अचानक तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अचानक तब्येत बिघडल्यामुळे मोनालीला दिनहाटा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

मोनाली ठाकूरने अद्याप तिच्या तब्येतीबाबत सोशल मीडियावर कोणतीही माहिती दिलेली नाहीये. तिची अचानक तब्येत बिघडल्याने चाहते देखील तिची तब्येतीबाबत बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोनाली ठाकूर प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिने वाराणसीमध्ये तिची संगीत मैफल मध्यंतरी थांबवली होती. कारण तेथील मैफिलीसाठी योग्य तयारी आणि व्यवस्थापनाचा अभाव असल्याचे तिने सांगितले होते. तिने दुखापत होण्याची भीती देखील वर्तवली होती.  त्यानंतर मोनालीने तिच्या चाहत्यांची माफी देखील मागितली होती.  तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने सांगितले आहे की, ती आणि तिची संपूर्ण टीम हा शो करण्यासाठी खूप उत्सुक होता. मात्र, तेथील व्यवस्थापनात दोष होता. सर्व काही चुकीचे होते.  

गायिका मोनाली ठाकूरने तिच्या करिअरची सुरुवात 2005 मध्ये केली.  जेव्हा तिने सिंगिंग रिॲलिटी शो 'इंडियन आइडल 2' मध्ये भाग घेतला होता. मोनाली 20 वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. मोनालीने आतापर्यंत 100 हून अधिक गाणी गायली आहेत. याशिवाय तिने आत्तापर्यंत अनेक संगीत कार्यक्रम देखील केले आहेत. त्याचबरोबर मोनाली सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. ती नेहमी तिच्या चाहत्यांसाठी तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते.

Share this article