Close

कडधान्यांची उसळ (Mix sprouts recipe)

कडधान्यांची उसळ


साहित्य : पाव कप मूग, पाव कप मटकी, 2 टेबलस्पून वाटाणे, 2 टेबलस्पून काबुली चणे, 1 टेबलस्पून मसूर, 2 टेबलस्पून चवळी, 1 कप जाडसर चिरलेला कांदा, 1 कप बारीक चिरलेला टोमॅटो, 1 लसणीचा कांदा, 1 इंच आलं, 5-6 आमसुलं, 2 तमालपत्रं, 1 इंच दालचिनीचा तुकडा, पाव टीस्पून मेथी दाणे, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, पाव टीस्पून हिंग, 8-10 कडिपत्त्याची पानं, अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल मिरची पूड, 2 टेबलस्पून तेल, अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून सैंधव मीठ, स्वादानुसार साधं मीठ.

कृती : सर्व कडधान्यं सकाळी स्वच्छ धुऊन पुरेशा पाण्यात वेगवेगळी भिजत ठेवा. रात्री निथळून चाळणीत झाकून ठेवा. दुसर्‍या दिवशी सकाळी उसळ करता येईल. उसळ करण्यापूर्वी पुन्हा सर्व कडधान्य धुऊन घ्या.
एका कढईत तेल गरम करून, त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की, त्यात तमालपत्र, दालचिनी, मेथी दाणे, जिरं, हिंग, कडिपत्ता यांची फोडणी करा. नंतर त्यात कांदा आणि आलं-लसूण जाडसर कुटून घाला. नरम होईपर्यंत परतवा. त्यात टोमॅटो घालून परतवा. आता त्यात हळद आणि लाल मिरची पूड घालून तेल सुटेपर्यंत परतवा. त्यानंतर त्यात कडधान्यं घालून चांगली एकजीव करा. झाकण ठेवून एक वाफ काढा. त्यात गरजेनुसार उकळतं पाणी घाला. आमसुलं घालून चांगली उकळी काढा. नंतर सैंधव आणि मीठ मिसळा. उसळ शिजल्यावर आच बंद करून कोथिंबीर घाला आणि गरमागरम उसळ सर्व्ह करा.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/