Close

मेथी लच्छा पराठा (Methi Lachcha Paratha)

रोज रोज पोळी खाण्याचा कंटाळा येत असेल तर पोळीला उत्तम पर्याय म्हणून अन्‌ मुलांनाही आवडेल असा हा मेथी लच्छा पराठा नक्की करून बघा.

साहित्य :

२ कप मेथी (चिरलेली)

३ कप गव्हाचं पीठ

१-१ टीस्पून आल्याची पेस्ट आणि जिरं

२ टीस्पून लाल तिखट

चवीनुसार मीठ

अर्धा कप बेसन

२-२ टेबलस्पून तेल आणि दही

२ हिरव्या मिरचीची पेस्ट

शेकण्यासाठी तूप

कृती :

तूप वगळता बाकी सर्व साहित्य एकत्र करा. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून नरम कणीक मळून घ्या. पीठाचा एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटा. त्यावर तूप लावून ती पोळी पुढे मागे दुमडून त्याचा गोल रोल करा. तो रोल चपटा करून पीठ लावून पोळी लाटा. आता नॉनस्टीक तवा गरम करून त्यावर तयार लच्छा पराठा टाका. दोन्ही बाजूने तूप लावून खरपूस शेकून घ्या.

तयार मेथी लच्छा पराठा दही वा लोणच्यासोबत गरमगरमच सर्व्ह करा.

Share this article