वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी मेडट्रॉनिक आणि आरोग्य तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी फिलिप्सने कार्डिओलॉजिस्ट व रेडिओलॉजिस्ट्सना स्ट्रक्चरल हृदयविकारांसाठीच्या प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानाविषयी शिक्षित व प्रशिक्षित करण्यासाठी भारतात एका सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केल्या. ३०० हून अधिक क्लिनिशियन्सचे, विशेषत्वाने अंतिम टप्प्यावरील रीनल आजाराच्या (ईएसआरडी) रुग्णांसाठी एकोकार्डिओग्राफी (एको) आणि मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय) सारख्या मल्टि-मोडॉलिटी इमेजिंग तंत्रज्ञान वापरण्याचे कौशल्य अधिक विकसित करण्याचे या भागीदारीचे लक्ष्य आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात विख्यात आंतरराष्ट्रीय आणि भारतीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विश्लेषणात्मक सत्रांची फिलिप्सच्या अत्याधुनिक अल्ट्रासाउंड आणि MRI यंत्रणांवर मिळणारा प्रत्यक्ष कामाचा अनुभव यांची सांगड घातली जाणार आहे. या शैक्षणिक कार्यशाळांसाठी स्ट्रक्चरल हृदयविकारांमध्ये विशेषत्ज्ञता प्राप्त १५ प्रमुख वैद्यकीय संस्थांना निवडण्यात आले आहे.
या सहयोगाविषयी बोलताना मेडट्रानिक इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि व्हाइस प्रेसिडंट मनदीप सिंग कुमार म्हणाले, “हा अभिनव प्रशिक्षण उपक्रम अंमलात आणण्यासाठी फिलिप्सबरोबर भागीदारी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. हा सहयोग म्हणजे रुग्णांना, विशेषत: क्रॉनिक किडनी डीजिज आणि ईएसआरडी हे आजार असलेल्या रुग्णांना अधिक चांगले परिणाम मिळवून देण्याप्रती आमची बांधिलकी जपण्यासाठी उचललेले एक लक्षणीय पाऊल आहे. विशेषीकृत प्रशिक्षण आणि प्रगत इमेजिंग उपाययोजना पुरवित आरोग्यसेवाक्षेत्रातील व्यावसायिकांना टीएव्हीआर (ट्रान्सकॅथेटर आओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशऩ) प्रक्रियांची अचूकता वाढविण्यासाठी व अंतिमत: रुग्णाच्या देखभालीत सुधारणा घडवून आणण्यासाठी लागणाऱ्या साधनांनी सुसज्ज बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. ”

“फिलिप्समध्ये आमचा प्रत्येक प्रयत्न हा अधिकाधिक लोकांना अधिक चांगली आरोग्यसेवा देऊ करण्याचा असतो आणि मेडट्रॉनिक बरोबरची ही भागीदारी म्हणजे याच उद्दीष्टापर्यंत पोहोचण्याच्या दिशेने उचललेले एक पुढचे पाऊल आहे. भारतभरात स्ट्रक्चरल हार्ट इमेजिंगच्या क्षेत्रातील नवसंकल्पना आणि शिक्षण यांवर लक्ष केंद्रित करून अशा सातत्यपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून मल्टि-मोडॅलिटी इमेजिंगमध्ये चाललेल्या वेगवान प्रगतीशी जुळवून घेण्याचा प्रश्न हाताळण्याचे आमचे लक्ष्य आहे. क्लिनिशियन्सना इकोकार्डिओग्राफी आणि MRI यांसारख्या अधिक अचूक निदानापर्यंत नेणाऱ्या व उपचारांचे अधिक चांगले परिणाम मिळवण्यास मदत करणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानांनी सक्षम बनिवणे हे आमचे लक्ष्य आहे.”
फिलिप्सचे भारतीय उपखंडासाठीचे मॅनेजिंग डायरेक्टर भारत शाह म्हणाले. “भारताच्या आरोग्यसेवेवर असलेल्या आजारांच्या मोठ्या बोजाचा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने भारताचे आरोग्यसेवेचे क्षेत्र प्रगती करत असताना क्लिनिकल अनुभवकुशलतेच वाढ करण्याशी व रुग्णांच्या देखभालीवर अर्थपूर्ण प्रभाव टाकण्याशी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
भारतात क्रॉनिक किडनी डिजिज (सीकेडी) ची प्रकरणे वाढत असल्याने दरवर्षी ईएसआरडीच्या सुमारे २.२ लाख रुग्णांची भर पडत असताना व ईएसआरडी रुग्णांतील आओर्टिक स्टेनोसिस असलेल्या रुग्णांना ट्रान्सकॅथेटर आओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) प्रक्रियेदरम्यान प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानापासून फायदा मिळू शकतो असे जागतिक अभ्यासामधून**सूचित झाले असताना प्रगत निदानात्मक उपाययोजना व क्लिनिशियन्ससाठी विशेषीकृत प्रशिक्षण यांची अत्यंत निकड निर्माण झाली आहे.
मेडट्रॉनिक ट्रान्सकॅथटर आओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (टीएव्हीआ) यंत्रज्ञेने अलीकडेच एक लक्षणीय टप्पा गाठला : २००४ साली आपली माणसांवरील अशाप्रकारची पहिली प्रक्रिया केली गेली त्याला २० वर्षे पूर्ण झाली. हे मोलाचे यश मेडट्रॉनिकची सातत्याने नवसंकल्पना मांडण्याप्रती मेटट्रॉनिकची अविचल बांधिलकी अधोरेखित झाली आहे. गेल्या दोन दशकांमध्ये मेडट्रॉनिकने भारतात टीएव्हीआ यंत्रणांची एक नवीन व नवी दिशा दाखविणाऱ्या मालिका आणत मिनिमली इन्व्हेसिव्ह हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटच्या सीमारेषा विस्तारली आहे व रुग्णांना मिळणाऱ्या परिणामांत सुधारणा घडवून आणली आहे.
फिलिप्सचे एआय तंत्रज्ञानावर चालणारे सॉफ्टवेअर 3D ट्रान्सइसोफेगल एकोकार्डिओग्राफी आणि MRI मधून मिळालेला डेटा वापरून महाधमनीच्या रचनेचे विश्लेषण करण्यास सक्षम आहे. हा नवा शोध विशेषत्वाने किडनीच्या आरोग्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे, कारण कॉन्टास्ट एजन्ट म्हणून काम करणारी रंगद्रव्ये नेफ्रोटॉक्सिक म्हणजे किडनीसाठी विषकारक असू शकतात व ईएसआरडी रुग्णांच्या किडनीचे कार्य अधिकच ढासळण्याचा मोठा धोका त्यात असतो. ही भागीदारी क्लिनिशियन्सना पर्यायी इमेजिंग पद्धती वापरण्यास सक्षम बनवित या रुग्णांचे आयुर्मान आणि आयुष्याचा दर्जाही लक्षणीयरित्या वाढविणार आहे.