Close

‘डासांची उत्पत्ती रोखणे कठीण’ – प्रतिबंधक उपाय करण्याबाबतच्या परिसंवादात तज्ज्ञांचे प्रतिपादन (Measures And Reforms Discussed In A Conclave To Combat Mosquito Borne Diseases Like Malaria And Dengue)

पावसाळा जोरात सुरू झाला आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव झालेला आहे. अन् डेंग्यू, मलेरिया या रोगांचा फैलाव होतो आहे. या रोगांचा फैलाव करणाऱ्या डासांचे बदलते वर्तन आणि त्यांची उत्पत्ती रोखण्याचे उपाय याबाबत एक परिसंवाद काल मुंबईत झाला. या प्रसंगी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या देशी बनावटीच्या रेनोफ्लुथ्रीन या घटकापासून बनविलेल्या उत्पादनाचे अनावरण करण्यात आले.

“शहरी भागात मोठ्या प्रमाणावर बांधकामे चालू आहेत. त्या ठिकाणी मलेरिया व डेंग्यूचे डास उत्पन्न होतात. त्यांचे वर्तन अनाकलनीय असते. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसले आहे,” असे सांगून सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार पुढे म्हणाले की, नेहमीची येणारा पावसाळा आता लहरी झाला आहे. परिणामी रोगांचा प्रतिबंध करणे हाच योग्य उपचार आहे. लोकांनी स्व-संरक्षणासाठी डास पळविणारे औषध वापरणे उपयुक्त ठरते.

“पूर्वी या डासांचा एक हंगाम असायचा. आता मात्र त्यांच्या वर्तनात फरक पडला आहे,” असे बालरोग तज्ञ आणि इंडियन अकादमी ऑफ पीडीएफचे खजिनदार डॉ. समीर दलवाई यांनी सांगितले.  अन् मुंबईमध्ये बऱ्याच इमारतींचा पुनर्विकास होत असल्याने बांधकामाच्या जागी डासांची उत्पत्ती होते, ते रोखणे अशक्य असल्याचे ते पुढे म्हणाले. “पर्यावरणात मोठे बदल झाल्याने घरात शुद्ध हवा खेळत नाही त्यामुळे लहान मुले खोकतात. आजारी पडतात. त्यांची सुरक्षिता तुम्ही कुठले रेणू वापरता त्यावर अवलंबून असते.”

डासांचे निर्मूलन करणारे नवे उत्पादन गोदरेजने सादर केले आहे. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ सुधीर सीतापति यांनी मलेरिया डेंग्यूच्या निर्मूलनासाठी 15 कोटी रुपये खर्चून संशोधन केल्याचे सांगितले. “शिवाय पाण्याची डबकी साचू देऊ नका. पाणी साठू देऊ नका, याबाबत आम्ही लोकांना शिक्षित केले व सरकारला मलेरिया निर्मूलन कार्यक्रमात मदत केली,” असे पुढे सांगून डासांचे आयुष्य पंधरा दिवसांचे असते. शिवाय दर 10 वर्षात त्यांची औषधाबाबत प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे त्यांच्यावर परिणाम करणाऱ्या औषधात दर 10 वर्षांनी आम्ही बदल करत आलो आहोत, असेही ते म्हणाले. या प्रसंगी 2030 सालापर्यंत आपला देश मलेरिया मुक्त करण्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Share this article