साहित्य :
२५० ग्रॅम घेवडा
१२५ ग्रॅम मटार
२ कांदे
२ टोमॅटो
२ चमचे लाल तिखट
२ चमचे सब्जी मसाला
१ चमचा हळद
चवीपुरते मीठ
४ चमचे तेल
अख्खा लसूण 2 पाकळ्या
कृती :
घेवडा स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावा. कांदे टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.
गॅसवर एका भांड्यात तेल गरम करून त्यात कांदा टोमॅटो परतून घ्यावेत.
त्यामध्ये दिलेलं साहित्य घालून घेवडा आणि मटार परतून घ्यावे.
झाकणावर थोडे पाणी ठेवून भाजीमध्ये घालून मंद आचेवर भाजी शिजू द्यावी.
मस्त चमचमीत घेवडा मटार सुकी भाजी तयार. पोळी किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावी.
Link Copied