मसाला स्क्रॅम्बल एग साहित्य : 4 अंडी, 2 टेबलस्पून तेल, 2 कांदे, 2 हिरव्या मिरच्या, 1 सिमला मिरची, 4 बटाटे, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार काळी मिरी पूड, अर्धा कप चीझ किसलेलं. कृती : कांदे, मिरच्या आणि बटाटे बारीक चिरून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, सिमला मिरची आणि हिरवी मिरची घालून परता. नंतर बटाटा, काळी मिरी आणि मीठ घालून बटाटा नरम होईपर्यंत शिजवा. त्यात किसलेलं चीझ आणि फेटलेली अंडी घालून चांगलं एकजीव होईपर्यंत ढवळा आणि थोडा वेळ शिजू द्या. मसाला स्क्रॅम्बल एग गरमागरम सर्व्ह करा. एग अँड कॅबेज समोसा साहित्य : 2 अंडी (कडक उकडून चिरलेली), 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून जिरं, 2 हिरव्या मिरच्या, 2 कप कोबी चिरलेली, अर्धा टीस्पून गरम मसाला, 4 चपात्या, 1 टेबलस्पून कणकेच्या पिठाची पेस्ट, तळण्यासाठी तेल, स्वादानुसार चाट मसाला, स्वादानुसार मीठ. कृती : पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि हिरव्या मिरचीची फोडणी द्या. नंतर त्यात कोबी, गरम मसाला पूड आणि मीठ घालून झाकण लावून शिजवा. उकडलेली अंडी आणि चाट मसाला घालून मिश्रण थंड होऊ द्या. नंतर चपातीचे दोन भाग करून, त्याचे कोन तयार करा. आता त्या कोनमध्ये अंड आणि कोबीचं मिश्रण घालून कोन पिठाच्या पेस्टने चिकटवून बंद करा. अशाच प्रकारे इतरही समोसे करून घ्या. गरम तेलात समोसे खमंग तळून घ्या.
Link Copied