एखाद्या बड्या अभिनेत्याला भेटणं, त्याला पाहणं ही प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. सर्वसामान्यांप्रमाणेच बरीचशी कलाकार मंडळी सुद्धा आहेत जी या अभिनेत्यांसाठी वेडी असतात. एकदा तरी त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करता यावी ही एकच इच्छा मनाशी बाळगून ही कलाकार मंडळी सिनेसृष्टीत वावरत असतात. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या नावाजलेल्या कलावंतांबरोबर काम करण्याची संधी मिळणे म्हणजेच सोने पे सुहागा… आणि हो बरीचशी मराठी कला विश्वातील अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांनी या दिग्गज कलाकारांसह स्क्रीनही शेअर केली आहे.

बरेचदा कोणीही वारसा हक्क नसताना वा काहीवेळा आपला वारसा पुढे चालवणाऱ्या एखाद्या कलावंताला या दिग्गज कलाकारासह काम करण्याचा अनुभव मिळणे ही अर्थातच अभिमानाची बाब आहे आणि हो असंच स्वप्न उराशी बाळगून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथून थेट मुंबईत आलेल्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं नावाजलेल्या कलाकारासह काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. ही अभिनेत्री म्हणजेच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा म्हणजेच अनुष्का सरकटे आणि दिग्गज कलाकारासह काम करण्याची संधी मिळालेला अभिनेता म्हणजेच बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान.
कुटुंबात सांगितिक पार्श्वभूमी असणाऱ्या अनुष्काने तिचा असा नवा प्रवास शिक्षण घेत असतानाच सुरू केला. ‘श्री लक्ष्मीनारायण’ ही तिची पहिलीच मालिका. यानंतर अनुष्काने कधी मागे वळून पाहिलंच नाही. यानंतर अनुष्काने ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत लोकप्रियता मिळवली. यापाठोपाठ ‘३६ गुणी जोडी’ ही तिची मालिकाही विशेष चर्चेत राहिली. मालिका विश्वात सक्रिय असणाऱ्या अनुष्काने जाहिरातीमधूनही प्रेक्षकांची मन जिंकली.

या मालिकाव्यतिरिक्त अनुष्काने जाहिरातीमधून तिचे नाव कमावले. पीएनजी ज्वेलर्स, पार्ले क्रॅकजॅक ,कीर्ती गोल्ड ऑइल, Big Basket, Lovingle diapers या नामवंत ब्रँडसाठी अनुष्का मुख्य चेहरा बनली. यानंतर आता अनुष्का बॅालीवूड सुपरस्टार सलमान खानसोबत जाहिरातीत झळकली. अनुष्काने सलमानसह काम करण्याचा योग आला आणि ते 10x classic atta या ब्रँडच्या जाहिरातीसाठी एकत्र काम करताना दिसले. सलमानबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणं हे अनुष्काचं स्वप्न होत आणि ते पूर्ण झालं.
हा अनुभव शेअर करत अनुष्का म्हणाली, “माझ एक स्वप्न पूर्ण झालं. सलमान खान यांच्याबरोबर काम करायची, त्याला भेटण्याची खूप इच्छा होती आणि ही इच्छा आज पूर्ण झाली. मला त्यांच्याबरोबर स्क्रीनवर कमी वेळ शेअर करायला मिळाला असला तरी हा अनुभव माझ्या आयुष्यभर लक्षात राहील”.