डॉक्टर विलास उजवणे, अतिशय गोड स्वभावाचा ऊमदा कलाकार काळाच्या पडद्याआड निघून गेला, आज खूप मन भरून आलं आहे, त्यांच्याबरोबर केलेल्या चित्रपटातलं काम, सगळं डोळ्यासमोरून जातय, त्यांचा उत्तम अभिनय आठवतोय, त्यांच्याबरोबर मारलेल्या मनमोकळ्या गप्पा आठवताय, त्यांचं खळखळून हसणं आठवतय,
खूपच छान स्वभावाचे होते डॉक्टर विलास उजवणे.
खरंतर पंधरा-वीस वर्ष मी त्यांच्या संपर्कात नव्हतो,
पण काही महिन्यापूर्वी, मी माझ्या DSLR camera ने आमच्या शूटिंगच्या दरम्यान click केलेले त्यांचे फोटोज मला अचानक सापडले आणि मी ते त्यांना व्हाट्सअप वर पाठवले, त्यानंतर आमचं फोनवर सुद्धा बोलणं झालं, त्यांचे मी काढलेले फोटोज बघून त्यांना खूप आनंद झाला होता, बराच वेळ गप्पा मारल्यानंतर त्यांच्या आजाराबद्दल कळलं, "ब्रेन स्ट्रोक झाला होता, heart चा थोडा issue आहे पण आता मी बरा आहे, आपण लवकरच भेटू या आणि एकत्र काम करूया पण डेली सोप करणं आता मात्र जमणार नाही . आपण एखादा सिनेमा परत करू या"
पण आमची भेट काही झाली नाही, परत एकत्र काम करायचं राहून गेलं. आणि आज ही बातमी ऐकून मनाला खूप धक्का बसला.
एका कलाकाराचं आयुष्य किती fragile अस्तं, शरीरात काही बिघाड झाला, तर पुन्हा पूर्ववत येणं किती कठीण जातं, पुन्हा तसंच पूर्वीसारखं काम करणं कठीण जातं,अवघ्या वयाच्या 62 व्या वर्षी डॉक्टर उजवणे आपल्यातनं निघून गेले,
माझ्यासमोर अनेक माझे उत्तम मराठी सहकार कलाकार शरीराने साथ न दिल्यामुळे फार लवकर निघून गेले, अतुल परसुरे ५७, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे ५४, रमेश भाटकर, कुलदीप पवार, सतीश तारे ४८.
या सगळ्यांमध्ये अजून भरपूर काम करायची जिद्द होती, इच्छा होती, भरभरून टॅलेंट होतं, पण शरीराने साथ दिली नाही,
डॉक्टर विलास उजवणे यांची पण भरपूर काम करायची इच्छा राहून गेली.
यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, आणि त्यांच्या कुटुंबाला परमेश्वर हे मोठे संकट सहन करण्याचे बळ देवो. शक्ती देवो...