मँगो-रोज सिरप
साहित्य : 1 कप आंब्याचा रस, 1 टेबलस्पून रोज सिरप, 2 टीस्पून लिंबाचा रस, 1 कप लिंबाचे सरबत, बर्फाचे तुकडे
कृती : सर्वप्रथम ग्लासात आंब्याचा रस घाला. यावर रोज सिरप टाका. सावर थोडासा लिंबाचा रस टाका. आता लिंबाचे सरबत मिसळा. थोडेसे रोज सिरप आणि लिंबाचा रस मिसळा. हे सिरप ग्लासातील सरबतावर हळूच टाका. टाकताना एका धारेनुसार गोल गोल टाका. लिंबाची चकती लावून सजवा आणि सर्व्ह करा.
बेसिक आइस्क्रीम
साहित्य : 2 लिटर दूध, 200 ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क, एक तृतीयांश कप साखर, एक तृतीयांश कप क्रिम.
कृती : जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळवून घ्या. दूध निम्म्या प्रमाणाचे होईपर्यंत आटवत रहा. यात कंडेन्स्ड मिल्क आणि क्रिम मिसळून आणखी 5-7 मिनिटे उकळवून घ्या. दुध साधारण थंड झाल्यानंतर घट्ट होण्यासाठी फ्रिजरमध्ये ठेवा (साधारण आठ तास). फ्रीजरमधून काढून त्याचे चौकोनी तुकडे करा आणि ब्लेण्ड करून घ्या. यात तुमचा आवडता स्वाद (फ्लेवर) मिसळून पुन्हा 6-8 तास फ्रीजरमध्ये ठेवा. हे बेसिक आइस्क्रीम तयार आहे. यात कोेणताही फ्लेवर मिसळून तुमच्या आवडीप्रमाणे आइस्क्रीम सजवा आणि सर्व्ह करा.