मँगो मॅजिक साहित्यः 1 वाटी घट्ट आमरस, 150 ग्रॅम आंब्याचा पातळ रस, 2 स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम, सजावटीसाठी आंब्याच्या फोडी. कृतीः सर्व प्रथम ग्लासमध्ये आमरस घ्या. मिक्सरमध्ये आंब्याचा रस व व्हॅनिला आईस्क्रीम एकत्र घुसळून घ्या. हे मिश्रण ग्लासात ओता. आंब्याच्या फोडीने सजवून थंडगार सर्व्ह करा.
शहाळ्याचे आईस्क्रीम
साहित्यः अर्धा लिटर दूध, पाव वाटी साखर, 1 वाटी शहाळ्याची मलई, सजावटीसाठी स्ट्रॉबेरी.
कृतीः प्रथम दूध उकळत ठेवावे. त्यात साखर घालून उकळून थंड करून ठेवावे. शहाळ्याची मलई गार झालेल्या दुधात घालावी व मिक्सरमधून फिरवावी. नंतर फ्रिजरमध्ये सेट करण्यास ठेवावे. सर्व्ह करताना स्ट्रॉबेरीने सजवावे.
Link Copied