चला आज काहीतरी नवीन करून पाहुया. बंगाली पद्धतीने आंब्याची आंबट- गोड चटणी बनवूया -
साहित्य:
२ कमी पिकलेले आंबे
प्रत्येकी पाव - पाव टीस्पून जिरे, बडीशेप, मोहरी, कलोंजी (कांद्याचं बी) आणि मेथी
२ चमचे किसलेला गूळ (चवीनुसार)
१ टीस्पून तेल, आल्याचा तुकडा (बारीक चिरलेला)
१/४-१/४ टीस्पून लाल तिखट आणि गरम मसाला पावडर
एक चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ
कृती :
आंबे सोलून त्यांचे बारीक तुकडे करा.
कढईत तेल गरम करून त्यात जिरं, बडीशेप, मोहरी, कलोंजी अन् मेथी घाला.
नंतर त्यात आलं घालून ३० सेकंद परतून घ्या.
आंब्याचे तुकडे, लाल तिखट, गरम मसाला पावडर आणि हिंग घालून २ मिनिटे परतून घ्या.
गूळ आणि मीठ घालून शिजवा.
घट्ट झाल्यावर विस्तवावरून उतरवा.
छान थंड झाल्यावर आंब्याची चटणी काचेच्या बरणीत साठवा.
(Photo Credit: Sailu's Food)