मनचाव सूप
साहित्यः 1 टेबलस्पून तेल, 5 मोठ्या पाकळ्या, बारीक चिरलेला लसूण, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, 1 कप भाज्या, एकदम बारीक चिरलेल्या भोपळी मिरची, गाजर, मशरूम, पाती कांद्याचा पांढरा भाग, 3 कप व्हेजिटेबल स्टॉक, 1 टेबलस्पून सोया सॉस, अधार्र् टीस्पून व्हिनेगर, अधार्र् टेबलस्पून टोमॅटो केचप, अधार्र् टेबलस्पून चिली मसाला सॉस,
1 टेबलस्पून कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लोअर, चिमूटभर व्हाईट पेपर पावडर, चवीपुरते मीठ, सजावटीसाठी पाती कांद्याचा हिरवा भाग, पाव कप शेवया (ऐच्छिक).
कृती: कढईत 1 टेबलस्पून तेल गरम करावे. त्यात बारीक चिरलेले आले आणि लसूण 4 ते 5 सेकंद परतावे. मिरची घालून परतावे. त्यावर चिरलेल्या भाज्या घालून अर्ध्या कच्च्या शिजवाव्यात. मीठ घालावे. भाज्या अर्धवट शिजल्या की 3 कप वेजिटेबल स्टॉक घालावा. एक उकळी आली की 1 टेबलस्पून सोया सॉस, टोमॅटो केचप आणि चिली मसाला सॉस घालून उकळवावे. चव पाहावी. लागल्यास मीठ घालावे. व्हाईट पेपर पावडर घालावी. 1 टेबलस्पून कॉर्न स्टार्च पाव कप पाण्यात मिक्स करून सूपमध्ये घालावे. 2-4 मिनिटे उकळी काढून व्हिनेगर घालावे. सर्व्ह करताना बाऊलमध्ये आधी सूप घालावे, त्यावर बारीक चिरलेला पाती कांद्याचा हिरवा भाग आणि तळलेल्या शेवया घालाव्यात.