मलाई कोफ्ता विथ व्हाईट ग्रेव्ही साहित्यः कोफ्त्यासाठीः 100 ग्रॅम बटाटे, 50 ग्रॅम पनीर, थोडीशी कोथिंबीर, 1 टीस्पून हिरवी मिरची, अर्धा टीस्पून आलं, 1 टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून वेलची पूड, प्रत्येकी 5 ग्रॅम काजू व मनुके, मीठ चवीनुसार. व्हाईट गे्रव्हीसाठीः 200 ग्रॅम काजू, 1 कांदा, प्रत्येकी 10 ग्रॅम हिरवी मिरची, बटर, आलं-लसूण पेस्ट, 10 मि.ली. क्रीम, 30 मि.ली. तेल. कृतीः कोफ्त्याचे साहित्य एकत्र करून वडे बनवा. हे वडे डिप फ्राय करा. व्हाईट ग्रेव्हीचे सर्व साहित्य एकत्र करून ग्रेव्ही बनवा. पॅनमध्ये तेल गरम करून हिरवी मिरची व व्हाईट ग्रेव्ही टाका. सर्व्हिंग बाऊलमध्ये कोफ्ते ठेवून व्हाईट ग्रेव्ही टाका. क्रीम व कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.
Link Copied