भारत - लव फिल्म्स निर्मित "देवमाणूस" सिनेमाचा टिझर नुकताच रिलीझ झालाय. या बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दमदार कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि त्यांच्यासोबत लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ बोडके हे सुद्धा आहेत. या नव्या आणि लव फिल्म्सच्या पहिल्याच मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचलाय आणि आता "देवमाणूस" चा टीझर पाहता प्रेक्षक वर्गाला एक आकर्षक सिनेमॅटिक अनुभव मिळणार आहे हे नक्की.
![](https://www.merisaheli.com/wp-content/uploads/2025/02/image-41-450x800.png)
या टीझरमध्ये आपण अभिनेता महेश मांजरेकर ह्यांना कधीही न पाहिलेल्या वारकरीच्या भूमिकेत पाहू शकतो, तसेच रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांचीही भूमिका अतिशय आकर्षक आणि जबरदस्त दिसत आहे. लक्ष वेधून घेणारे दृश्य आणि वेगवान साउंडट्रॅकसह, "देवमाणूस" चित्रपटाची भव्यता समजून येते.
विशेष म्हणजे, देवमाणूसचा टीझर संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये विकी कौशलच्या छावा चित्रपटासह प्रदर्शित केला जाणार आहे, जे या मराठमोळ्या चित्रपटाला अपेक्षित असलेल्या उच्च प्रेक्षकवर्गा पर्यंत पोहोचवेल आणि त्याचा लाभ मिळेल.
टीझर रिलीझच्या उत्साहात, दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणतात, “देवमाणूस हा माझ्यासाठी अतिशय रोमांचक प्रोजेक्ट आहे कारण त्याची विलक्षण बांधणी आणि त्यातील पात्रांची सखोलता या प्रतिभावान कलाकारांनी जिवंत केली आहे. हा चित्रपट बनवण्याचा संपूर्ण प्रवास खूपच मनोरंजक आहे आणि या टीझरद्वारे प्रेक्षकांपर्यंत या सिनेमाची एक झलक शेअर करताना मला खूपच आनंद होत आहे. देवमाणूस २५ एप्रिल २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल आणि म्हणूनच मी प्रेक्षकांनी हा सिनेमा अनुभवण्याची आतुरतेने वाट पाहतो आहे.”
लव फिल्म्स प्रस्तुत, "देवमाणूस" या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर ह्यांनी केले आहे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.