महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्विक प्रताप त्याचा प्रियसी सोबत ( प्राजक्ता वायकुळ ) लग्न बंधनात अडकला असून अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला ! अगदी मोजक्याच मित्र मंडळी आणि घरच्या सोबत हा लग्न सोहळा पार पडला असून पृथ्विकच्या या कृती मागे तेवढंच खास कारण देखील आहे.

मोठ्या थाटामाटात हा सोहळा का केला नाही असं विचारल्या वर पृथ्विक म्हणाला "मला आधीपासून हा क्षण अगदी साध्या पद्धतीने घरच्यासोबतीने साजरा करायचा होता आणि लग्नाचा सगळा खर्च आम्ही दोघे एका सामाजिक कारणासाठी वापरणार आहोत. आम्ही दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जवाबदारी घेत आहोत.

आमच्या लग्नाचा खर्च हा आम्ही या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी करणार आहोत. खरंतर असं काही करून कोणाचं तरी आयुष्य अजून सुंदर बनवता येतंय यातच सगळं आलं आणि आमच्या लग्नाचं हेच बेस्ट गिफ्ट आहे अस आम्हाला वाटतं"

पृथ्विक ने त्याचा अभिनयातून कायम प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि आता त्याचा या कृतीचं सगळेच तोंड भरून कौतुक करतात !