Close

‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’साठी सर्वाधिक मानधन घेणारी सेलिब्रिटी आहे तेजस्वी प्रकाश (List of highest paid MasterChef contestants; Tejasswi tops)

हिंदी टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेताच दोन नवे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आले. एकाबाजूला ‘लाफ्टर शेफ २’ तर दुसऱ्या बाजूला ‘सोनी टीव्ही’वर ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’ कार्यक्रम सुरू झाला आहे. सध्या या दोन्ही कार्यक्रमांमध्ये टक्कर पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कलाकार वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसत आहेत. नुकतंच सुरू झालेल्या ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’मध्ये तेजस्वी प्रकाशपासून दीपिका कक्कड, अर्चना गौतम, गौरव खन्ना, चंदन प्रभाकर, राजीव अदातिया, निक्की तांबोळी असे बरेच कलाकार पाहायला मिळत आहेत.

‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’मध्ये एकूण ११ लोकप्रिय कलाकारांनी सहभाग घेतला आहे. तसंच फराह खान, रणबीर बरार आणि विकास खन्ना परीक्षक आहेत. पण ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’ या कार्यक्रमासाठी सहभागी असलेल्या सेलिब्रिटींना दर आठवड्याला तगडे मानधन दिलं जातं. या कलाकारांमध्ये सर्वाधिक मानधन कोणाला मिळतंय आणि इतर कलाकारांना किती मानधन दिलं गेलं? जाणून घ्या…

‘बिग बॉस’च्या १५व्या पर्वाची विजेती तेजस्वी प्रकाशने ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’साठी सर्वाधिक मानधन घेतलं आहे. ‘टेली टॉकिज’च्या माहितीनुसार, तेजस्वीने प्रत्येक आठवड्यासाठी ३ ते ४ लाख रुपये मानधन घेतलं आहे. तर ‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका कक्कडला प्रत्येक आठवड्यासाठी २ ते ३ लाख मानधन दिलं जात आहे.

तेजस्वी, दीपिकानंतर नंबर लागतो ‘अनुपमा’ मालिका सोडणारा अनुज कपाडियाचा. ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’ कार्यक्रमासाठी अनुज प्रत्येक आठवड्यासाठी २.५ रुपये मानधन घेत आहे. तसंच लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णीदेखील या कार्यक्रमात पाहायला मिळत आहेत. त्यांना या कार्यक्रमासाठी प्रत्येक आठवड्याला १ लाख मानधन दिलं जात आहे.

याशिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मिस्टर फैजूला २ लाख मानधन आहे. तर ‘बिग बॉस’च्या १६ पर्वात झळकलेली अर्चना गौतमीसाठी १.५ लाख मोजले जात आहेत. शिवाय ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व गाजवलेली निक्की तांबोळी प्रत्येक आठवड्यासाठी १.५ लाख आणि राजीव अदातिया १ लाख मानधन घेत आहेत.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/