'लाफ्टर शेफ्स २' मध्ये अंकिता लोखंडे आणि रुबिना दिलैक यांच्यात भांडण झाल्याचे बोलले जात आहे. रागाच्या भरात, वेस्टर्न बहूने स्वयंपाक करण्याचे तर सोडून दिले आहे. आगामी भागात भारती सिंग आणि शेफ हरपाल स्पर्धकांना दोन संघात विभागतील, त्यापैकी एक टीम रुबिना आणि दुसरी टीम अंकिताची असेल असे पाहायला मिळणार आहे.

या कुकिंग स्पर्धेक, रुबीना दिलैक अंकिता लोखंडेकडे काहीतरी साहित्य मागण्यासाठी जाते. पण अंकिता लोखंडे तिला ते देण्यास स्पष्टपणे नकार देते.

रुबिना दिलैकला अंकिता लोखंडेचे वागणे आवडत नाही. त्यामुळे रुबिना तिचे कुकींगमध्ये थांबवते. रुबिनाचेही असे वागणे पाहून त्यांचे सहकारी आश्चर्यचकित होतात. या शोचा प्रोमो अद्याप प्रदर्शित झालेला नाही.

पण मीडिया रिपोर्ट्समध्ये याबद्दल सध्या चर्चा होत आहे. विशेष म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये रुबिना आणि अंकिता एकमेकींच्या पार्टनर होत्या. तेव्हा रुबिना सर्वांसमोर म्हणाली होती की, कोण म्हणतं दोन सुंदर अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी असू शकत नाही.