कुम्भ मटार मसाला साहित्यः 200 ग्रॅम मशरूम, 100 ग्रॅम मटार, प्रत्येकी 5 ग्रॅम हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे पूड, धणे पूड, गरम मसाला, लाल मिरची पूड, प्रत्येकी 1 कांदा व टोमॅटो, 2 टेबलस्पून व्हेजिटेबल ग्रेव्ही, मीठ चवीनुसार. व्हेज ग्रेव्हीसाठी साहित्यः 1 किलो चिरलेले कांदे, 200 ग्रॅम काजू, 500 ग्रॅम टोमॅटो, 50 ग्रॅम आलं-लसूण पेस्ट, 25 ग्रॅम लाल मिरचीची पेस्ट, 150 मि.ली. तेल, 25 ग्रॅम अख्खे गरम मसाले (दालचिनी, लवंग, वेलची व जायपत्री), 25 ग्रॅम दही, प्रत्येकी 5 ग्रॅम धणे पूड व हळद, 10 ग्रॅम जिरे पूड, 2 ग्रॅम गरम मसाला. कृतीः व्हेज ग्रेव्हीसाठीः तेल गरम करून जिरे, अख्खे मसाले व कांदे टाकून परतून घ्या. थंड झाल्यावर वाटून घ्या. काजू व टोमॅटोची पेस्ट बनवा. सोनेरी भाजल्यावर आलं-लसूण पेस्ट टाका व लाल मिरची पेस्ट टाका. दही, जिरे पूड, धणे पूड, गरम मसाला, हळद टाकून शिजवा. कांद्याची पेस्ट, काजू व टोमॅटोची पेस्ट व पाणी घालून शिजवा. मशरूम उकडून बाजूला ठेवा. पॅनमध्ये तेल गरम करून कांदा, टोमॅटो व सर्व मसाले टाका. मशरूम व मटार टाकून परता. व्हेजिटेबल ग्रेव्ही घालून शिजवा. क्रीमने गार्निश करून सर्व्ह करा.
धनसाक
साहित्यः अर्धा कप तूर डाळ, अर्धा कप मसूर डाळ, 2 टेबलस्पून मूग डाळ, 2 टेबलस्पून चणा डाळ, अर्धा कप लाल भोपळा, 1 चिरलेला कांदा व बटाटा, अर्धा कप मेथीची पाने, अर्धा कप पुदिना, 2 टेबलस्पून धनसाक मसाला (बाजारात तयार मिळतो.), 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, प्रत्येकी 1 टीस्पून हळद, लाल मिरची पूड, साखर, चिंचेचा कोळ, 1 टेबलस्पून तेल व मीठ चवीनुसार.
कृतीः भांड्यात सर्व डाळी, बटाटा, कांदा, मेथी व पुदीना घालून उकडून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा घालून परता. यात आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो, हळद, लाल मिरची पूड व धनसाक मसाला घालून परता. यात शिजवलेली डाळ घालून मंद आचेवर शिजवा. साखर व चिंचेचा कोळ घाला. गरम गरम सर्व्ह करा.