Close

जया बच्चन यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, सोनू निगमने खरचं केली ती कमेंट? (Kumbh is the most contaminated water’ Sonu Nigam slams Jaya Bachchan for her statement, is that true? )

एकेकाळी तिच्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांचे मन जिंकणाऱ्या जया बच्चन आता त्यांच्या रागामुळे अधिक चर्चेत आहेत. बऱ्याच वेळा रागाच्या भरात त्या असे काही वागतात किंवा बोलतात ज्यामुळे वाद निर्माण होतो. यावेळी जया बच्चन यांनी कुंभमेळ्याबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या आहेत आणि त्यावरून वाद निर्माण झाला आहे. सोनू निगमने ट्विटरवर यावर प्रतिक्रिया दिल्यावर या मुद्द्यावरील गोंधळ आणखी वाढला. संपूर्ण प्रकरण काय आहे

जया बच्चन काय म्हणाल्या?

जया बच्चन यांनी महाकुंभमेळ्यावर वादग्रस्त विधान केले आहे. संगमचे पाणी दूषित असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी सांगितले की, चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले, ज्यामुळे कुंभमेळ्याचे पाणी आणखी घाणेरडे झाले. जया बच्चन यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे आणि कुंभमेळ्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्या म्हणाल्या, "सध्या सर्वात जास्त दूषित पाणी कुठे आहे? कुंभमेळ्यात… चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह नदीत टाकण्यात आले आहेत, त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. खऱ्या मुद्द्यांवर कोणीही बोलत नाही. कुंभमेळ्याला येणाऱ्या सामान्य लोकांना विशेष सुविधा दिल्या जात नाहीत, त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. कोट्यवधी लोक तिथे आले आहेत असे खोटे बोलले जात आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकाच वेळी एकाच ठिकाणी कसे जमू शकतात?"

सोनू निगम जया बच्चनवर संतापला

जया बच्चन यांचे हे विधान ऐकून सोनू निगमला राग आला आणि त्याने जया बच्चनचा हा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करून आपला राग काढला. सोनू निगमने लिहिले, "जया बच्चनजींनी मानसिक संतुलन गमावले आहे. अमिताभजी, त्यांना चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा." सोनू निगमच्या या प्रतिक्रियेनंतर लोकांनी जया बच्चन यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे आणि त्यांच्याबद्दल वाईट साऊट बोलू लागले आहेत आणि जया बच्चन मानसिकदृष्ट्या असंतुलित झाल्याचे म्हणत आहेत. त्या सतत बकवास बोलत राहतात. त्यांच्या वागण्यामुळे त्यांची सून ऐश्वर्या मुलीसोबत वेगळी राहत आहे.

टिप्पणी करणारा गायक सोनू निगम नाहीये.

सोनू निगमची एक्स वरील कमेंट येताच लोकही अ‍ॅक्शनमध्ये आले आणि हे ट्विट व्हायरल होऊ लागले. लोकांना समजले की हा गायक सोनू निगम आहे, त्यामुळे लोकांची त्यात रस वाढला आणि लोकांनी जया बच्चन यांना कमेंट करून लक्ष्य करायला सुरुवात केली. पण नंतर हे ट्विट सोनू निगमने नसून बिहारमधील फौजदारी वकील सोनू निगम सिंगने केल्याचे उघड झाले. सोनू निगमने काही वर्षांपूर्वी पुष्टी केली होती की तो ट्विटरवर नाही. त्याने सात वर्षांपूर्वी एक्स (ट्विटर) सोडले.

Share this article