Close

भारत आणि कोरिया यांच्यातील संगीत व संस्कृतीचा संगम साधणारा महोत्सव संपन्न (‘Kolab’ Grand Finale Concluded : Collaboration Of Culture And Music Between India And Korea)

भारत आणि कोरिया या दोन देशातील उदयोन्मुख कलाकारांचा ‘कोलॅब’ हा संगीत महोत्सव काल संपन्न झाला. इंडियन परफॉर्मिंग राईट सोसायटी आणि कोरियन म्युझिक कॉपीराईट असोसिएशन या दोन संस्थांच्या वतीने कर्जत येथील विजयभूमी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ म्युझिकमध्ये भारत व कोरिया मधील १९ तरुण संगीतकारांनी संगीतरचना साकारल्या. क्रिएटिव डायरेक्टर बंटी बैंस आणि मयुर पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली या कलाकारांनी जगभरातील संगीताची निर्मिती केली. त्याची झलक या महोत्सवाची सांगता झाल्याच्या निमित्ताने सादर करण्यात आली.

मुंबईमध्ये आयोजित कोलॅबच्या संगीत सत्रात कोरिया व भारतातील तरुणांनी आपल्या एकाहून एक सरस अशा संगीतरचना सादर केल्या. निमंत्रितांनी त्यांना पसंतीची दाद दिली. आपल्याकडील विविध प्रांतातील तरुणाईने कोरियन तरुणांसह झालेल्या शिबिरात भाग घेतला होता.

Share this article