कियारा अडवाणी सध्या कामातून ब्रेक घेऊन आपल्या आयुष्यातील या सुंदर टप्प्याचा आनंद घेऊ इच्छिते. काही दिवसांपूर्वीच तिने गरोदर असल्याची घोषणा करुन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. पण आता कियारा गरोदरपणामुळे हातातले काही महत्वाचे सिनेमे सोडत आहे.

'कियारा सध्या 'टॉक्सिक' आणि 'वॉर २' चे शूटिंग पूर्ण करत आहे. यानंतर ती तिच्या कुटुंबासोबत आणि होणाऱ्या बाळासोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेईल. मात्र या सर्वामधून कियाराने डॉन ३ मधून काढता पाय घेतला आहे.

२०२३ मध्ये फराहन अख्तरने डॉन ३ ची घोषणा केली होती. यावळी या सिनेमात शाहरुख खानची जागा रणवीर सिंहने घेतल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजीचे सूर उमटले होते. पण आता कियारा अडवाणीनेही या सिनेमा सोडल्यामुळे आणखी नाराजी निर्माण झाली आहे.


असे म्हटले जाते की, कियारा अडवाणी मॅटरनिटी ब्रेकनंतर मॅडॉक फिल्म्ससोबत तिचा पुढचा प्रोजेक्ट सुरू करेल. 'शक्ती शालिनी' मध्ये दिनेश विजन कडून कियारा प्रमुख भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले आहे. ही फिल्मसुद्धा मॅडॉकच्या हॉरर-कॉमेडीचा एक भाग आहे. कियाराला यशराज फिल्म्सने 'धूम ४' मध्ये रणबीर कपूरसोबतही कास्ट केले आहे.