Close

मातृत्व आनंदाचा पवित्र ठेवा (Keep Motherhood Sacred)

आजची आई मजुन्या आईफसारखं नवर्‍याच्या दबावाखाली येऊन आपले निर्णय त्या मुलांवर थोपत नाही. उलटपक्षी एकीकडे नवर्‍याची बोलणी खात, मुलांना न दुखावता, त्याच्या मनाचा विचार करून त्यांना काय हवंय, त्यांना काय झेपेल, याची काळजी करत सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करते. आजची स्त्री कितीही आधुनिक झाली तरी ती ही पूर्वीप्रमाणेच अनंतकाळची माता आहे.


आपल्या पुराणात स्त्रीविषयी बरंच काही लिहीलं गेलंय, पण एक माता म्हणून तिला कायम मानाचं स्थान आहे. स्त्रीला वेगवेगळ्या नात्याची ओळख असली तरी ती आई झाली की तिला आपसूकच वेगळी ओळख मिळते, वेगळी जबाबदारी येते.
मातृत्वाची चाहूल लागणं हा स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण. जितका तिला सुखावणारा असतो तसाच इतरांनाही.
निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी तिचा कलिजा पदरी निजला, जिवापलीकडे जपे त्याजला कुरवाळूनि चिमण्या राजाला, चुंबी वरचेवरी.
कवी भा.रा. तांबे यांची ही कविता आईला, आपल्या बाळाविषयी वाटणार्‍या वात्सल्याचं सुंदर चित्रण आहे. कृत्रिम आणि इन्स्टन्ट गोष्टींनी भरलेल्या आजच्या जगातही आईला आपल्या बाळाबद्दल वाटणारा जिव्हाळा आणि मुलांना आपल्या आईबद्दल वाटणारी ओढ, कोवळी भावनिकता अजूनही तेवढीच ताजी आहे.
पूर्वीच्या काळातल्या मातांना फारसं खोलवर जाऊन विचार करण्याची गरज नव्हती. चारी ठाव स्वयंपाक करून मुलाबाळांना खाऊ घातलं, आजारपणं काढली, काळजी केली की आईचं कर्तव्य पार पाडल्याचं समाधान मिळत असे. पण आजकालच्या आधुनिक आईला ही परंपरेतली आई व्हावं तर लागतंच, पण त्याचबरोबर हल्ली भरपूर स्पर्धा वाढल्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शंभरेक गोष्टींची जाणही ठेवावी लागते. वेगवेगळे छंदवर्ग, शिबिरे, योग्य शाखा निवडणं, त्यांचं मानसशास्त्र, वयात येतानाचे प्रॉब्लेम्स. बाईची चाळीशी ओलांडणं आणि मुलगा/मुलगी वयात येणं, एकाच ट्रॅकवर दोन्ही गोष्टी आल्याने त्यांची आपापसात टक्कर होतेच. त्यामुळे त्यातून तयार होणार्‍या समस्यांना तोंड द्यावं लागतं.

हक्काची आई
प्रत्येक मुलाची आई ही त्याची अगदी हक्काची आई असते. आपण घरी आल्यावर आईने समोर दिसावं, आपल्या आवडीचं खायला बनवावं, कौतुक करावं ही त्याची अपेक्षा. ती माऊलीसुद्धा मग तिच्या कुवतीनुसार मुलांच्या इच्छा, आवडी जपण्याचा, पुरविण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहते.
काही वेळा हल्लीच्या आया नोकरीमुळे किंवा करिअरमुळे आपल्या मुलांचं संगोपन हवं तसं करू शकत नाहीत. मनाविरुद्ध पाळणाघरात ठेवावं लागतं. क्वालिटी टाइम देणं जमत नाही. हा अपराधी भाव सतत त्यांच्या मनात रेंगाळत असतो. तसंच कॉर्पोरेट क्षेत्रातली स्त्री कितीही मोठ्या पदावर असली किंवा उच्च शिक्षण घेतलेली स्त्री तिलाही सर्वसामान्य आईचंच प्रेम लाभलेलं असतं. अशा वेळी ती स्वतःला दोष देत राहते आणि मुलांच्या नको त्या मागण्याही पूर्ण करण्यात आनंद मानते. मग एक वेगळीच समस्या आकाराला येऊ लागते किंवा वेळेअभावी नीट संगोपन करू शकत नाही म्हणून मुलांना बोर्डींग स्कूलमध्ये ठेवलं जातं. पुढे याचा परिणाम म्हणून आई-मुलांचं नातं कोरडं होण्याचीही शक्यता असते.
आजची आई ङ्गजुन्या आईफसारखं नवर्‍याच्या दबावाखाली येऊन आपले निर्णय मुलांवर थोपवत नाही. उलटपक्षी एकीकडे नवर्‍याची बोलणी खात, मुलांना न दुखावता, त्याच्या मनाचा विचार करून त्यांना काय हवंय, त्यांना काय झेपेल, याची काळजी करत सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करते. आजची स्त्री कितीही आधुनिक झाली तरी तीही पूर्वीप्रमाणेच अनंतकाळची माता आहे. त्यासाठी वेळप्रसंगी सुपरमॉम किंवा सुपरवुमन होऊ पाहते.
स्वतःच्या वैयक्तिक जीवनात स्वतःची हौसमौज, शिक्षण, मित्रमैत्रिणी, प्लानिंग, निर्णय या सगळ्यांना महत्त्व देणारी आजची मुलं स्वतःच्या आईला काय हवं, काय नको, तिच्या अपेक्षा, आवडी-निवडी याकडे किती लक्ष देतात? तिने जन्म दिलाय, तिचं ते कर्तव्यच आहे, मुलांसाठी राबणं क्रमप्राप्तच आहे, असं म्हणणं म्हणजे तिच्या आईपणाचा अपमान करणं. पण हे कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

स्वतंत्र व्यक्ती
आई एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तिची स्पेस जपायला हवी. प्रसंगी तिच्या पाठीशी उभं राहायला हवं. हे मुलांना जाणवलं तरी तिला खूप काही गवसल्याचा आनंद होईल.
म्हणूनच या ङ्गमदर्स डेफ च्या निमित्ताने तिला तिची स्पेस मिळवून द्यायला मदत करणं तिच्याकडून आपण ज्या आईपणाच्या अपेक्षा करतो ते कमी करणं, किंवा तिच्या काही गोष्टी करायच्या राहून गेल्या असतील त्या गोष्टी मिळवून देण्यासाठी यथायोग्य प्रयत्न करणं ही सर्वात मोठी गिफ्ट असेल. मुलाबाळांच्या हौशी पूर्ण झाल्या पाहिजेत म्हणून
स्वतःच्या हौशींना टाळणारी आई…

आयुष्यातले नाजूक साजूक प्रसंग सांगावेत ते आईलाच…
आई म्हणजे विश्‍वासाचं शेवटचं टोक… अशा आईच्या आईपणाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी असे कितीही ङ्गडेफज आले तरी ते आपल्याला कमीच पडतील.
आपल्याकडे भारतात पिठोरी अमावस्या किंवा पोळा हा दिवस मातृदिन म्हणून ओळखला जातो. आई ही केवळ बाळाची आई नाही तर संस्कारांचीही जननी आहे. अनेक थोर पुरुषांचे जीवन घडवण्यात मातांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. जसे प्रभू रामचंद्र, शिवाजी महाराज इत्यादी.
आईपण हे स्वतः जन्म दिलेल्या मुलांपुरतंच संबंधित नसतं. बाळाला जन्म न देताही कित्येक थोर व्यक्ती ह्या माता होत्या आणि आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मदर तेेरेसा आणि आत्ताच्या सिंधुताई सकपाळ. त्या तर जवळ जवळ साडेसातशे मुलांच्या माता आहेत.
मातृत्व हा निसर्ग नियम आहे. तो अनादिकालापासून चालत आला आहे नि असंच चालत राहणार आहे. तुमच्या जीवनात कुठलंही पद कुणीही हिरावून घेऊ शकतं, पण मातृत्वपद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही, हा अखंड पवित्र आनंदाचा ठेवा तुम्हाला आयुष्यभर पुरतो म्हणूनच जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत कातडीचा रंग बदलला तरी मातृत्वाचा रंग बदलत नाही. मातृत्वाची भावनाही वैश्‍विक असते.
ङ्गमदर्स डेफ ही संकल्पना जरी परदेशी असली तरी या मातृदिनाचा सोहळा आपल्याही समाजात पुन्हा एकदा नव्याने उत्साहात साजरा व्हायला हवा.

  • अनुपमा राव

Share this article