Close

शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तीत तल्लीन झाली कतरिना कैफ, सासूबाईंसोबत घेतले दर्शन ( Katrina Kaif Goes To Shirdi Saibaba Temple With Mother In Law)

प्रसिद्ध सिने अभिनेत्री कतरीना कैफ यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात उपस्थित होते.

बॉलीवूडची प्रसिद्ध सिने अभिनेत्री कतरीना कैफने शिर्डीत साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.. पती विकी कौशल याचा छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत छावा हा हिंदी चित्रपट काही दिवसातच प्रदर्शित होणार आहे.

. कैतरीना हिने साई समाधीचे दर्शन घेत चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केली. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने कैतरीना कैफचा सत्कार करण्यात आला.

साई मंदिरा बाहेर पडताना प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीनी कतरीना सोबत कैफ संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र कतरीनाने माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही.

यावेळी कतरिना सासूबाईंसोबत म्हणजे विकी कौशलच्या आईसोबत शिर्डीला बाबांच्या दर्शनाला गेली होती.

Share this article